मोटारीचा आकार म्हणजे केवळ तिचे रुपडे कसे हा नाही. त्या मोटारीमध्ये असणारी आसन व्यवस्था, त्यात किती माणसे आरामात बसू शकतील, सामान वाहून नेण्याची सुविधा किती हवी आहे ते लक्षात घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यावर मोटार हॅचबॅक घ्यायची, छोटेखानी घ्यायची की मोठी सेदान घ्यायची. एसयूव्ही घ्यायची की एमयूव्ही घ्यायची अशा बाबी निश्‍चित करता येतील. त्यामुळे कुटुंबात अधिक माणसे असतील तर मोठी एसयूव्ही वा एमयूव्ही घेण्याचा निर्णयही घेता येईल. यातून या विविध प्रकाराच्या मोटारींच्या संशोधनातून मोटारींच्या एकंदर किंमतीची तुलनाही होईल व तुमच्या मोटारीच्या खरेदीसाठी मुळात तुमची आर्थिक मर्यादा नेमकी किती आहे ती बाब लक्षात येईल.

 आपली मोटार खरेदी करण्यापूर्वी विविध अंगांनी विचार करून मगच कोणती मोटार घ्यावी याचा निर्णय घ्यावा. यामध्ये अनेक घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. मोटारीची किंमत ही काही सहजगत्या परवडेल अशी नाही, भले एखाद्या कंपनीला आपल्या अधिकार्‍यासाठी मोटार घेऊन द्यायची असते, तेव्हाही त्याबाबत विचार केला जातो. कंपनीच्या दृष्टीने त्या अधिकार्‍याचे महत्त्व, त्याला शोभेल अशी ती मोटार असावी याच बरोबर ती चांगल्या कंपनीची, चांगल्या बनावटीची असावी. ती इंधन वाचविणारी, कमी देखभालखर्च करणारी आणि आरामदायी व उपयुक्तही असावी, याबद्दल कंपनीच्या संबंधितांकडून विचार केला जात असतो. याच पार्श्‍वभूमीवर वैयक्तिक वा कौटुंबिक वापरासाठी मोटार घेतानाही सर्वांगांनी विचार केला पाहिजे व निर्णय घेतला पाहिजे. यातील एक घटक म्हणजे आपली नेमकी गरज कोणती आहे हे प्रत्येक खरेदीदाराने जाणले पाहिजे. मोटार आपल्याला कशी उपयोगी आहे हे पाहिले पाहिजे. यामध्ये मोटारीचा आकार, मोटार जास्तीतजास्त कोणत्या रस्त्यावर वापरणार, रस्त्याची स्थिती कशी आहे, मोटार कौटुंबिक वापरासाठी आहे की पूर्णपणे वैयक्तिक वापरासाठी आहे, मोटारीतून प्रामु‘याने किती जण प्रवास करणार आहेत, मोटारीमध्ये सुविधा हव्यात त्या कोणत्या हव्यात, त्या अधिकाधिक हव्या असतील तर तितकी रक्कम मोजावी लागणार आहे, ती रास्त आहे की नाही ते पाहाणे. त्याचप्रमाणे त्या सुविधांचा वापर करताना त्यांची देखभाल नीट होईल की नाही, त्या खराब रस्त्यावर मोटारीचा वापर अधिक असल्यास त्यांचा टिकावूपणा कसा राहील हे विचारात घ्यायला हवे. तसेच मोटार घेतल्यानंतर तिचा वापर किती काळ करण्याची इच्छा आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. मोटारीचा आकार म्हणजे केवळ तिचे रुपडे कसे हा नाही. त्या मोटारीमध्ये असणारी आसन व्यवस्था, त्यात किती माणसे आरामात बसू शकतील, सामान वाहून नेण्याची सुविधा किती हवी आहे ते लक्षात घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यावर मोटार हॅचबॅक घ्यायची, छोटेखानी घ्यायची की मोठी सेदान घ्यायची. एसयूव्ही घ्यायची की एमयूव्ही घ्यायची अशा बाबी निश्‍चित करता येतील. त्यामुळे कुटुंबात अधिक माणसे असतील तर मोठी एसयूव्ही वा एमयूव्ही घेण्याचा निर्णयही घेता येईल. यातून या विविध प्रकाराच्या मोटारींच्या संशोधनातून मोटारींच्या एकंदर किंमतीची तुलनाही होईल व तुमच्या मोटारीच्या खरेदीसाठी मुळात तुमची आर्थिक मर्यादा नेमकी किती आहे ती बाब लक्षात येईल. आजच्या घडीला मोटारीच्या विविध प्रकारांनी भारतीय बाजारपेठ व्यापलेली आहे. मारुती मोटारीच्या ( maruti 800) मारुती ८०० या मोटारीने भारतीय वाहनउद्योगाचा चेहरा पालटला. पूर्वीच्या ऍम्बेसेडर व प्रीमियर पद्मिनी या मोटारींना मारुती ८०० ने पर्याय दिला. वेगाबरोबरच वाढत्या वाहतूक वर्दळीमध्ये सहज वाहनचालनासाठी छोटेखानी मोटारींचा पर्याय भारतीय ग्राहकांपुढे आला. नवमध्यमवर्गाचा उदय आयटी उद्योगामुळे वाढू लागला व त्या वर्गामध्ये वाहन विकत घेण्याचा कल वाढला त्याचा परिणाम समाजातील अन्य घटकांमध्येही पडला. यानंतर टाटा मोटर्सच्या इंडिका मोटारीनेही भारतीय ग्राहकाला डिझेलवरील छोटेखानी मोटार वापरण्यास प्रवृत्त केले. पेट्रोलपेक्षा स्वस्त असणार्‍या डिझेलमुळे इंडिका मोटारही वैयक्तिक वापराप्रमाणेच व्यावसायिक वापरासाठीही वापरली जाऊ लागली. काही कमी अधिक दोषांमुळे त्या मोटारी व्यावसायिक स्तरावर अधिक वापरल्या जाऊ लागल्या. टॅक्सीसाठी त्यांचा वापर अधिक होऊ लागला. त्यानंतर टाटा मोटर्सनेही या इंडिकाच्या धर्तीवर पुढील नवी मॉडेल्स विकसित करीत बाजारात आपला ठसा उमटविला. नॅनो ही देखील टाटा मोटर्सचे एक लक्षणीय असे उत्पादन ठरले. छोटेखानी, सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना परवडावी अशा दृष्टीने आणलेली ही मोटार आता सीएनजीमध्ये उपलब्ध झाली आहे. देऊची मॅटिझ मोटारही काही काळ लोकप्रिय ठरली पण कंपनी बंद झाली. ह्युंदाईनेही मारुती ८००, झेन, वॅन आर या मोटारींच्या स्पर्धेत आपली सॅन्ट्रो मोटार उतरविली व छोटेखानी मोटारींच्या महत्त्वपूर्ण अशा टप्प्याला भारतीय बाजारपेठेत स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. परदेशी कंपन्यांना भारतातील या उद्योगामध्ये यामुळेच उडी घ्यावीशी वाटली. येथील वाढती ग्राहकसं‘या हा परदेशी कंपन्यांच्या आगमनासाठी केंद्रबिंदू होता. भविष्यामध्ये होणार्‍या या ग्राहकवाढीच्या आशेवर आज भारतीय बाजारपेठेत परदेशातील केवळ जपान, कोरियाच नव्हे तर फ्रान्स, अमेरिका व जर्मनी, बि‘टन या देशांमधीलही मोटार उत्पादक कंपन्यांनी उडी घेतली आहे. वाढत्या ग्राहकांच्या इच्छाही वाढल्या आहेत. मारुती ओम्नीनेही व्हॅन प्रकारामध्ये जणू एकाधिकारशाहीच मिळविली होती. अपघातामध्ये अधिक नुकसान होऊ शकते, अशी भीती असूनही ओम्नी व्हॅनची लोकप्रियता कमी नाही. स्वस्त आणि अधिक जागा देणारी ही व्हॅन अजूनही ग्राहकांमध्ये विकत घेतली जाते. शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळे ग्राहक परिसर असल्याने त्यांच्या त्यांच्या निकडी वेगवेगळ्या आहेत. ग्रामीण भागामध्येही आज एसयुव्ही विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. टाटा मोटर्सची सुमो ही सुरुवातीची एसयुव्ही प्रकारातील मोटार आज तिनेही नवे रूप धारण केले आहे. त्या प्रकारात ग्राहकसं‘या वाढत आहे. त्याचे कारण त्यामध्ये असणारी प्रशस्त जागा, डिझेलमुळे असणारा किफायती मायलेजचा घटक व सेदान प्रकार वापरणार्‍यांनाही आज एसयुव्ही वापरण्याचा मोह पडला आहे. मोटार म्हणजे शाही व श्रीमंतीचे लक्षण असल्याचे मानणारा वर्ग सेदान प्रकारातील मोटारींवरच भिस्त ठेवून होता. सेदानमधील एकूण आरामदायी आसनांचा व जागा जास्त असल्याने त्या मोटारी लांब असल्याने असणारा प्रेस्टिजियसपणा विसरूनही आता अनेक ग्राहक एसयुव्हीकडे वळू लागले आहे.

 एकंदर एकेकाळची चैन आज अनेकांची गरज बनत आहे. किमान शहरांमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीमध्येही अनेकांना मोटार हवी आहे. ते ती घेतात व चालवितात. तशी सहजता वाहन चालनामध्ये मिळाली आहे ती नवीन पॉवर स्टिअरिंग या घटकामुळे. मोटारी लहान असो वा मध्यम मोठ्या असोत वा एसयुव्ही पद्धतीच्या मोटारीने मिळणारा सर्वसाधारण सार्वजनिक वाहनाच्या प्रवासातील त्रास कमी होत असल्याने आणि वाढत्या क्रयशक्तीमुळे मोटार घेण्याची गरज वाटणारा भारतीय ग्राहक वाढला आहे हे मात्र नक्की!

मोटारींची ही नेमकी गरज कोणती आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्येक आर्थिक गटाची एक सर्वसाधारण धारणा मोटार घेण्यामागे आहे. ती नेमकी कोणती ते पाहाण्यासारखे आहे. यामध्ये छोटी मोटार, मोठी मोटार, अधिक सुविधा, वेगाची अपेक्षा, इलेक्ट्रॉनिक सुविधांमधील वैविध्य, इंधनाबाबतची क्षमता, मोटारीचे बाह्य सौंदर्य, अंतर्भागातील सौंदर्य अशा बाबींवर लक्ष दिले जाते. या प्रत्येक घटकांप्रमाणेच आर्थिक घटकही दिसतात. जे घटक वैयक्तिक वापराच्या ग्राहकांच्या गटामध्ये दिसून येतात. व्यावसायिक वापराच्या ग्राहकांमध्येही बदल झाले आहेत. मोटार विकत घेताना आता चोखंदळपणा दिसू लागला आहे. या प्रत्येक घटकाचा विचार करीत मोटार कोणती घ्यायची याचा विचार केला जातो व केला गेला पाहिजे.

——-

http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/driverless_car_insurance.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/driverless_car_insurance-150x150.jpgadminविशेष लेखauto,brand,car,central locking,clutch,consumer,coustomer,dashboard,deeper,design,dikky,dipper,door,engine,family,garages,gears,hatchback,headlamp,luxuary,maintance,market,mat,milege,motor,personal,power window,powertrail,production,road,seat,sedan,service,service centre,spare parts,speed,suspension,suv,tail lamp,tyres,upper,use of vehicle,van,wheels
 मोटारीचा आकार म्हणजे केवळ तिचे रुपडे कसे हा नाही. त्या मोटारीमध्ये असणारी आसन व्यवस्था, त्यात किती माणसे आरामात बसू शकतील, सामान वाहून नेण्याची सुविधा किती हवी आहे ते लक्षात घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यावर मोटार हॅचबॅक घ्यायची, छोटेखानी घ्यायची की मोठी सेदान घ्यायची. एसयूव्ही घ्यायची की एमयूव्ही घ्यायची अशा...