मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात येते याला पायी चालवावे…   वाहन बाळगणे हे पांढरा हत्ती पोसण्यासारखे ठरू नये, तसे झाले तर मनात योजतो काय व होते काय, अशी विचित्र स्थिती तयार होते. त्या स्थितीला तोंड देणे मग खूप कटकटीचे होऊन बसते. यासाठीच चारचाकी पदरी बाळगण्याची इच्छा मनात असली तरी आपले वाहन ही चैन आहे की ती गरज आहे, समाजात आपले स्थान काही विशिष्ट पद्धतीने तयार करण्यासाठी वा मोठे मानाचे स्थान प्राप्त करण्यासाठी वाहन पदरी बाळगावयाचे आहे का, याचा विचार करून मगच वाहन घ्यायचा बेत ठरवा, आपला खिसा, आपली तिजोरी तपासा, नीटपणे आपल्या आर्थिक मानसिकतेबरोबर ताकदीचाही अंदाज घ्या. किंबहुना वाहनाचा वापर कशासाठी व कसा करणार हे देखील पक्के करून ठेवा, त्यामुळे वाहन ही गुंतवणूक तुमच्यासाठी खर्‍या अर्थाने उपयुक्त ठरू शकेल.

चारचाकी वाहनाचे आकर्षण अगदी लहानपणापासून सर्वांनाच असते. केवळ आताच्या काळात नव्हे तर अगदी गेल्या २०-२५ वर्षांपूर्वीही लहानपणापासून हे आकर्षण होते. आज दूरचित्रवाणीवर वा प्रसार माध्यमांमध्ये दिसणारी विविध प्रकारची वाहने अगदी ४ वर्षांच्या बाळालाही ओळखता येतात. ही मर्सिडिझ, ही बीएमडब्ल्यू, ही ऑडी, ही मारूतीची गाडी तर ही ङ्गोक्सवॅगन अशी ही विविध कंपन्यांची मोटारींची चलती सुरू झाली. त्या त्या कंपन्यांची मॉडेल्स कोणती हे सहजपणे ओळखणारी लहान मुले पाहिली की अचंबित व्हायला होते हे खरे. पण त्यात आता आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. समाजातील विविध आर्थिक गटांकडे नजर टाकली की त्यांची मनोवृत्ती समजून येते. गेल्या दशकामध्ये आयटी (माहिती-तंत्रज्ञान) उद्योगाने अनेकांना चांगले रोजगार दिले. त्यामुळे त्या क्षेत्रात नोकरी वा व्यवसाय करणार्‍यांची सं‘याही वाढली. शैक्षणिक संस्थांची वाढ आणि त्यामुळे उत्पन्नाचे साधन कोणते, उत्पन्नासाठी चांगले उद्योग साधन म्हणजे वाहन कोणते हे देखील समाजातील अनेकांनी जाणले. अगदी ग‘ामीण भागातही ही स्थिती तयार झाली व शहरांकडे वा नव्याने निर्माण होऊ घातलेल्या निमशहरी-शहरी भागांकडे उद्योगातील कामधंद्यासाठी लोकांना जावे लागले. रस्ते विकसित होऊ लागले. यामुळे प्रवासाची दैनंदिन गरज वाढली. एकत्र कुटुंब पद्धतीही ङ्गुटली व विभक्त वा इनमीन तीन माणसांची कुटुंबेही तयार झाली. आयटी उद्योगाप्रमाणेच अन्य काही उद्योगही वाढले. पूर्वीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे हे खरे, पण त्यामुळे होणार्‍या या विकासामुळे भारतीय मनांची स्थिती ही अजूनतरी ङ्गार मोठ्या प्रमाणात बदललेली नाही. परंपरा, रीतीरिवाज यावरही समाजमनाचा कल कायम राहिला आहे. या सर्व परिस्थितीच्या प्रभावातून कुटुंब व्यवस्थेवर परिणाम झाला, मानसिकतेवर परिणाम झाला, जवळची माणसे लांब लांब राहू लागली त्याचप्रमाणे व्यक्तीवादाच्या आत्यंतिकतेत वाढ झाली. साहजिकच एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची गरज निर्माण झाली. हे प्रमाण कमी नाही, त्यामुळे सार्वजनिक वाहनापेक्षा स्वत:चे वाहन असावे, ते बरे अशी मानसिकता वाढू लागली. प्रत्येकाच्या या प्रवासाची स्थिती कमी अधिक असते, त्यामुळे काहींना दुचाकी वाहन पुरेसे ठरले तर काहींना चारचाकी वाहन आवश्यक वाटले. यामुळेच वाहनउद्योगाला गति मिळाली, हे नाकारता येणार नाही.

आर्थिक गट वेगवेगळ्या प्रकारांमध्ये निर्माण झाले आहेत. सर्वसाधारणपणे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भाग असे वर्गीकरण केल्यास तेथे नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक व निवृत्त व्यक्ती, अनिवासी भारतीय असे गट मोटारी घेणार्‍यांमध्ये दिसून येतात. प्रत्येक गटाच्या गरजा त्याच्या त्याच्या भागांप्रमाणेही अवलंबून असतात. यामुळे त्यांनी आपापल्या भागांप्रमाणे असलेली त्यांची वाहनाची गरज नेमकी कशा प्रकारची आहे हे ओळखले पाहिजे. हॅचबॅक, सेदान, स्टेशनवॅगन, व्हॅन वा एसयुव्ही-एमयुव्ही या वाहन प्रकारांची निवड करण्याबरोबरच त्या वाहन प्रकारातील नेमके कोणते मॉडेल व नेमक्या कोणत्या कंपनीचे व मॉडेलमधील नेमक्या कोणत्या दर्जाचे-श्रेणीचे पाहिजे, ते सर्वप्रथम स्पष्ट करायला हवे. म्हणजेच त्यासाठी त्यांनी आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्या वाहनाची निवड करायला हवी. ही निवड करणे म्हणजेच वाहन ही आपली गरज आहे की चैन आहे, चैन आहे की प्रेस्टिज इश्श्ाू म्हणून ते पाहात आहेत, हे ही स्पष्ट होऊ शकते.

नोकरदार गट – नोकरदार गटातील व्यक्तींचे काही आर्थिक स्तर पडलेले दिसतात. मासिक ५० हजार रुपये उत्पन्न, ५० हजार ते १ लाख रुपये वा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणारा वर्ग. त्याचप्रमाणे काही नोकरदारांना त्यांच्या कंपनीकडूनच मोटारीसाठी कर्ज दिले जाते, विशिष्ट पद्धतीच्या मोटारी घेण्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे एक ठरावीक रक्कम मोटारीसाठी मर्यादा म्हणून निश्‍चित केलेली असते. कंपनीकडून इंधन भत्ता दिला जातो काही वेळा तो मर्यादित रुपात असतो. हे सारे लक्षात घेऊन काही नोकरदार वर्ग हे मोटार नेमकी कोणती हवी ते निश्‍चित करीत असतो. आर्थिक दृष्टीने सक्षम असणारा नोकरदार गटातील हा वर्ग असतो. याच नोकरदार गटात दाम्पत्याचा वा कुटुंबाचे मिळून असणारे उत्पन्न ५० हजार ते एक लाख रुपये वा त्यावर असते आणि त्यांची कंपनी त्यांना मोटार घेण्यासाठी काही देत नसते वा केवळ कन्व्हेन्स देत असते, अशा नोकरदार मंडळींना मोटार परवडते खऱी पण नेकी कोणती व कशासाठी मोटार घ्यायची आहे त्याचे गणित त्यांना नेमके समजलेले नसते. हे माहिती करून घेणे त्यांच्यादृष्टीने आवश्यक आहे. व्यावसायिक गट – व्यावसायिक गटामध्ये शहरी व निमशहरी वा ग्रामीण भागातील व्यक्ती-कुटुंबे येतात. त्यांच्या गरजा त्या त्या भागाप्रमाणे, त्यांच्या व्यवसायाप्रमाणेही बदलत असतात. आर्थिक स्थिती मात्र त्यांची वेगवेगळी असली तरी मोटारीची गरज ही मात्र त्यांची त्यांनी ठरवायची असते. व्यवसायातील कामांप्रमाणेच कौटुंबिक स्तरावरही त्यांच्या मोटारीची गरज ठरत असते. त्यामुळे मोटार घेताना त्यांनी आपली आर्थिक मर्यादा किती व मोटारीची नेमकी गरज कोणती हे निश्‍चित करायला हवे. त्याप्रमाणे त्यांची मोटार घेणे ही त्या त्या व्यवसायाला अनुरूप अशी आहे की नाही, तशी त्यांची गरज आहे का, हे देखील पाहायला हवे. असे सांगण्याचे कारण म्हणजे काही काळापूर्वी डॉक्टरच्या दृष्टीने मोटार ही रूग्णाला पाहायला जाण्याचे गतिमान साधन इतकी होती. कालांतराने ती त्याची कौटुंबिक गरजही होती, इतकेच नव्हे तर इस्पितळात जाण्यासाठीही त्याची ती गरज होती. काही डॉक्टर्स आपल्या दर्जानुसार आर्थिकतेनुसार मोटार घेत होते. जसे सुरुवातीला मारुती ८०० मोटार वापरणारे डॉक्टर नंतर मोठी मोटार घेण्याऐवजी हॅचबॅक प्रकारातील मोटार घेणे पसंत करीत. याचे कारण ती चालवायला सोपी, रुग्णाकडे जायला व झटकन पार्क करायला सोपी, रुग्णालयामध्ये असणारी शहरी भागातील गर्दी लक्षात घेऊन छोटेखानी मोटार बरी असे समजत. मात्र कालांतराने त्यांच्यादृष्टीने मोठी मोटार व छानपैकी इंटेरिअर असलेली महागडी मोटारही त्यांना कौटुंबिक वापरासाठी आवश्यक वाटू लागली त्यामुळे त्यांना एक नव्हे तर दोन मोटारी लागू लागल्या. ही एक सर्वसाधारण स्थिती असणारी नमुन्याची बाब लक्षात घेतली, तर व्यावसायिक गटाची नेमकी गरज कशी आहे ते स्पष्ट होऊ शकते. शहरी व निमशहरी भागात अनेक व्यवसाय आहेत, तेथील व्यावसायिकांकडे दोनपेक्षा अधिक मोटारीही असल्याचे दिसते. कुटुंबातील प्रत्येकाची मोटार असल्याचेही दिसते. सांगण्याचा मुद्दा असा की अशा प्रकारच्या व्यावसायिकांच्या गटाने आपल्या गरजा नेमक्या ओळखल्या तर मोटार कोणत्या प्रकाराची घ्यावी हे स्पष्ट होऊ शकते. ज्यांना एकच मोटार परवडते अशा व्यावसायिकांना मात्र कौटुंबिक व व्यावसायिक वापर यासाठी संयुक्तपणे उपयोगी ठरेल अशी मोटार उपयुक्त ठरते. त्यामुळे एसयुव्ही घेणे त्यांना अनेकदा सोयीस्कर वाटते.

शेतकरी गट – सधन शेतकर्‍यांना कौटुंबिक वापराप्रमाणेच व्यावसायिक उपयुक्ततेच्या दृष्टीनेही वाहन गरजेचे ठरते. व्यावसायिक गटाप्रमाणेच त्यांची स्थिती असते. उद्योजक गट- उद्योजकांच्या आवडी निवडी व उपयुक्ततेप्रमाणे प्रेस्टिजचा विचारही मोटार घेताना केला जातो. अर्थातच तो प्रत्येक उद्योजकाचा वैयक्तिक दृष्टीकोन असतो. परंतु सर्वसाधारणपणे त्यांच्या बाबतीतही व्यावसायिक गटाप्रमाणे मोटारीची गरज एकापेक्षा अधिक असते. अर्थात मोटार निवडीबाबत अनेकदा त्यांच्यात चोखंदळपणा असतो वा अनुकरणाचीही वृत्ती असते.

निवृत्त व अनिवासी भारतीयांचा गट – या गटामधील अनेकजण हे सेवानिवृत्तीनंतर प्रवासाच्या सहजसुलभतेसाठी व विविध कामांच्या उपयुक्ततेसाठी मोटार घेतात. त्यांना ती स्वस्त हवी असते, चालवायला सोपी हवी असते. ङ्गार मोठ्या सुविधा नकोत पण हाताळायला सहज हवी असते. यांचा प्रवास ङ्गार मोठा वा दीर्घ नसतो पण त्यांची ती गरज असते. तर अनिवासी भारतीयांनाही भारतात आपल्या कुटुंबासाठी व ते येथे परत आल्यानंतर प्रवासासाठी मोटार हवी असते. प्रत्येकजणाची गरज वेगळी असते. कोणाला मोठी वा कोणाला छोटी मोटार हवी असते. एसयुव्हीसुद्धा या गटात घेतात.

एकंदर मोटार विकत घेणे ही प्रत्येक गटाची गरज आहे अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. अर्थात भारताच्या एकंदर लोकसं‘येपैकी टक्केवारीनुसार विचार केला तर हे सर्व गट ङ्गार मोठ्या सं‘येचे नाहीत. परंतु तरीही संभाव्य ग‘ाहकांबाबत मोटार उत्पादक कंपन्या आशादायी असतात, ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे. मोटार कोणतीही घेतली तरी तिची किंमत, त्यातील सुविधा यापेक्षाही ती ज्या ठिकाणी वापरणार आहात तेथे सेवा केंद्रे नीट आहेत का, सुटे भाग नीट मिळतात का, रस्ते कसे आहेत, ती किती वापरणार आहात यावर तुमची गरज कोणत्या मोटारीची व कोणत्या कंपनीची मोटार घेणार आहात त्याची निश्‍चिती करा तरच मोटारीचा वापर करताना निश्‍चिंत राहू शकाल. अन्यथा मोटार ही गर न बनता चैनीची परंतु पांढरा हत्ती पोसण्यासारखी बाब ठरू शकेल.

—-

http://wegvan.in/wp-content/uploads/2014/11/wvcrashtestdatsun-swift-e1422034982295.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/11/wvcrashtestdatsun-swift-e1422034982295-150x92.jpgadminविशेष लेखarea,auto,brand,car,car and profession,central locking,city,clutch,consumer,coustomer,dashboard,deeper,design,dikky,dipper,doctor,door,engine,enginer,farmer,garages,gears,hatchback,headlamp,maintance,market,mat,milege,motor,power window,powertrail,production,seat,sedan,service,service centre,spare parts,speed,suspension,suv,tail lamp,tyres,upper,use of vehicle,van,village,wheels
मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात येते याला पायी चालवावे...   वाहन बाळगणे हे पांढरा हत्ती पोसण्यासारखे ठरू नये, तसे झाले तर मनात योजतो काय व होते काय, अशी विचित्र स्थिती तयार होते. त्या स्थितीला तोंड देणे मग खूप कटकटीचे होऊन बसते. यासाठीच चारचाकी पदरी बाळगण्याची इच्छा...