मोटारीची देखभाल – २

 

गॅरेज, रस्ते, हवामानआदींबद्दलही पूर्ण लक्ष हवे

—–

मोटारीची देखभाल ही सर्वात महत्त्वाची असते. या देखभालीमध्ये अनेक घटक समाविष्ट असतात. मोटार विकत घेण्याआधी व घेताना त्याबद्दल पूर्ण विचार करूनच मोटार खरेदी करावी, ज्यामुळे भविष्यात देखभालीपाठी धावाधाव करावी लागणार नाही.

देखभालीविषयी काही महत्त्वाच्या घटकांचा मोटारीची देखभाल – १  मध्ये  विचार केला होता. त्याच्या पुढील मुद्द्यांकडे आता नजर टाकू.

५) तुमच्या भागातील खाजगी गॅरेजची उपलब्धता- सर्वसाधारणपणे शहरी भागांमध्ये अधिकृत सेवा केंद्रे व खाजगी छोटी -मोठी गॅरेजेस् मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. निमशहरी वा ग्रामीण भागात मात्र तसे नसते. मोटारींचे व मोटारधारकांचे वाढते प्रमाण पाहिले तर सेवा केंद्रे ही फार उपलब्ध नसल्याने किंवा लांब असल्याने वेळ काडून प्रत्येकाला त्या कामाच्या मागे धावायला लागते ही वस्तुस्थिती आहे. दुसरा भाग खाजगी गॅरेजेस्‌चे प्रमाणही तसे फार नसते. त्यामुळे आपण राहात असलेल्या भागामध्ये मोटारीच्या देखभालीसाठी खाजगी गॅरेजवर अवलंबून राहाणे आवश्यक असते. अशी गॅरेजेस्‌ही आपल्या भागात जवळ असणे, माहितीत असणे महत्त्वाचे असते. ही गॅरेजेस्‌ची उपलब्धता आहे की, नाही त्याचीही खात्री करा. मोटार घेणार्‍या सर्वच व्यक्ती काही शहरात राहात नसतात. आज ग्रामीण भागामध्येही मोटारमालक वाढलेले आहेत. मात्र त्या प्रमाणात अधिकृत सेवा केंद्रे वाढलेली नाहीत वा पसरलेली नाहीत. दुसरी बाब म्हणजे कायमस्वरूपी या अधिकृतसेवा केंद्रांवर अवलंबूनही राहाणे शक्य नसते. अशासाठी आपण राहात असलेल्या ठिकाणी अशी खासगी गॅरेजेस किंवा मोटार मेकॅनिक उपलब्ध आहे की नाही, तेथे सेवा कशी मिळते,  तेथे सुटे भाग नसले तर आणले जाऊ शकतात की नाही, की त्याची खरेदीही तुम्हालाच करावी लागणार आहे, आदी विविध गोष्टी स्पष्ट करून घ्या. त्यामुळे भविष्यामध्ये मोटारी घेतल्यानंतर तुम्हाला अडचण आल्यानंतर धावपळ वा शोधाशोध करावी लागणार नाही.

६) इंधनि वषयक बाबी – मोटारीसाठी आज विविध इंधनपर्याय मिळू लागले आहेत. यामध्ये विशेषकरून पेट्रोल व डिझेल हे सर्व महामार्गावर,  तालुका,  गावात उपलब्ध असणारे इंधन आहे. मात्र त्यांच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक आज सीएनजी, एलपीजी, वीज या पर्यायी इंधनाकडे वळला आहे. विशेषकरून सीएनजी इंधनाचा वापर आज प्रामुख्याने शहरी लोक करू लागले आहेत. काही ठिकाणी सीएनजीपेक्षा काहीसे महाग अशा एलपीजीचाही वापर केला जातो. मात्र प्रामुख्याने सध्यातरी सीएनजीवर अवलंबून अनेक वाहनचालक शहरात सीएनजी भरतात व ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर सीएनजी संपल्यावर पेट्रोल-डिझेलचा वापर करतात. यात प्रमाणक नसणारे सीएनजी कीट वापरणे किंवा एलपीजी वापरणे हा प्रकार ग्रामीण भागात सरार्र्स होतो. तो केला जाऊ नये. केवळ किंमती इंधनाचा वापर टाळण्यासाठी अशा पद्धतीने इंधन वापर केला जाऊ नये. इंधनाची उपलब्धता, त्यानुसार त्याची देखभाल हे तुमच्या भागात आहे की नाही, याची खात्रीही करणे गरजेचे असते. इंधनाच्या वापरानुसार मोटारीची काही क्रियाही कमी अधिक प्रमाणात होत असते. सर्वसाधारण वातानुकूलीत यंत्रणा सीएनजीवर वाहन चालविले जात असल्यास इंजिनवर त्याचा ताण पडतो. घाटात वा चढावाच्या रस्त्यावरही हा प्रकार होत असतो. त्यामुळे मोटारीच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत असतात. ते टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी इंधन वापर करताना योग्य ठिकाणी योग्य साधनसामग्रीने सज्ज असणारे इंधन पर्याय निवडा वापरा. त्यामुळे सुरि क्षतताही राहाते व देखभालीचा प्रश्‍नही सुटू शकतो. पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असला तरी त्याचा संबंध मोटारीच्या इंजिनाशी असल्याने त्याच्या ते वापरताना काळजीपूर्वक वापरा. त्याचे ज्वलन होते ती पद्धत वेगळी असल्याने तसेच ते तीव्र ज्वलनशील असल्याने त्याची काळजी घेणे, सीएनजी टाकीची नीट स्थिती राखणे आवश्यक आहे.

७) रस्ते व अन्य संलग्न बाबी ज्या वाहनांच्या स्थितीला कारणीभूत आहेत …- तुम्ही ज्या भागात राहात आहात, च्या भागात मोटार सातत्याने वापरणार आहात, तेथील रस्ते गुळगुळीत असतीच असे नाही. चांगल्या स्थितीत असतील असे नाही. त्यामुळे रस्ते कसे आहेत, ते लक्षात घेऊन मोटार चालन करा, त्यामुळे तुमच्या मोटारीचा तसा वापर हा देखील देखभालीचाच एक प्रकार आहे. तुमच्या भागातील वातावरण कोरडे असेल तर मोटार सातत्याने धुतल्यानंतर गंजण्याची भीती कमी असते. खार्‍या हवेच्या ठिकाणी मात्र तसे होत नाही. त्या ठिकाणी शक्यतो विनाकारण मोटार धुणे ही बाब टाळा. मोटार धुतल्यानंतर त्यातील पाणी साचून देऊ नका, त्यामुळे मोटारीचा पत्रा गंजण्याची शक्यता असते. मोटार अति उन्हाच्या प्रदेशात असेल तर शक्यतो पार्किंग करण्याच्या ठिकाणी ती सावलीत करा, उन्हात केली तर मोटारीच्या सर्व काचा कडेकोट लावू नका, त्यामुळे कधी कधी अंतर्गत उष्णताही मोटारीच्या काचा तडकि वण्यास कारण ठरू शकते. रस्त्यांची स्थिती ही तुमच्या मोटारीचे आयुष्य ठरि वणारी असते. मातीच्या रस्त्यांवर, काँक्रिट रस्त्यांवर सातत्याने जाणारी मोटारीची दौड टायरवर परिणाम करीत असते. डांबरी रस्त्यांवर तुलनेने मोटारीचे टायर अधिक टिकतात, अर्थात डांबरी रस्त्यांचा दर्जा व स्थिती चांगली हवी. त्यामुळे रस्त्याची स्थिती पाहून वाहन चालनाची तुमचे वळण नीट ठेवा.

पावसाळ्यामध्ये प्रत्येक भागात असणारी स्थिती वेगवेगळी असू शकते. पावसाळ्यात तुमच्या मोटारीला पाघोळ्यांखाली उभे करू नका. तसेच चिखलाच्या रस्त्यावरून धावून आल्यानंतर तो चिखल जास्त काळ राहाणार नाही याची काळजी घ्या. अंतर्गत भागात पाणी जळत नाही याचीही त्या मोसमात काळजी घेणे गरजेचे असते. तिन्ही मोसमांमध्ये मोटारीची निगा घेताना वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. अर्थात हा प्रकार प्रत्येक भागामध्ये असणार्‍या हवामानाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे.

८) मोटारींच्या अंतर्गत व बाह्य अतिरिक्त सुविधांशी संलग्न बाबी – देखभालीच्या भविष्याचा विचार करताना मोटारीच्या अंतर्गत बाबींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. यामध्ये अंतर्गत भागातील बसण्याच्या आसनांचा, त्यावरील कव्हर्सचा, डॅशबोर्डचा, आत वापरण्यात आलेल्या प्लॅस्टिकचा, छताच्या आच्छादित कापडाचा, मॅटचा, तुमच्या मोटारीच्या दरवाज्याची बिजागिरे, मुठी- कुलुप आदी बाबींना देखभालीमध्ये खूप महत्त्व आहे. याचे एक छोटेसे उदाहरण मुद्दाम द्यावेसे वाटते. जी बाब मोटारीच्या वापराशी निगडित आहे. मोटार एकटाच वापरणारा माणूस ज्यावेऴी केवळ चालकाच्या दरवाज्याचा वापर करतो बाकी दरवाज्याचा वापर करीत नाही. कारण मागे बसणारे कोणीच नसते. अशावेळी होते काय की दरवाज्याची क्रिया न झाल्याने बिजागिरे व कुलुप ही खराब होतात. त्यामुळे सर्व दरवाज्यांची उघडझाप होण्याची क्रिया ही झालीच पाहिजे. हीच बाब सर्व अंतर्गत भागाची आहे. त्यामुळे सतत सर्व वस्तुंचा वापर होणे व त्या नीट आहेत की नाहीत ते कळणे ही देखील देखभालीचीच बाब आहे. अंतर्गत भागात दिलेल्या विविध सुविधांचा वापर केला गेला पाहिजे. त्या नीट ठेवल्या गेल्या पाहिजेत.

९) देखभाल खर्चाची तरतूद – मोटार विकत घेताना एक बाब पक्की लक्षात ठेवा की देखभाल खर्चासाठी (हॅचबॅक वा सेदान या मध्यम किंमतीच्या मोटारींचा विचार करता) मोटारीच्या नावे किमान एक लाख रुपये इतकी रक्कम बाजूला ठेवा. अल्पकालीन व्याजावर ती ठेवली तरी चालेल पण, ही विशिष्ट रक्कम मोटारीच्या देखभालीसाठी हाती लगेच मिळणे गरजेचे असते. कारण प्रत्येक बाबतीत विमा कंपनी वा वॉरंटी कालावधीचा फायदा उपयोगाचा असतोच असे नाही. त्यामुळे मोटारीचा दुरूस्ती वा अन्य कामासाठी होणारा खर्च हा तुम्हाला स्वतंत्रपणे करावा लागतो. त्यामुळे मोटारीसाठी स्वतंत्र अशी रक्कम वेळीच हाती वापरता येते.

१०) वाहनांच्या उत्पादक कंपनीसंलग्न घटक – मोटार घेताना अनेक आश्‍वासने देणार्‍या कंपन्या, नेमक्या कशा पद्धतीने पुढील कालावधीत कार्य करतात, ते आधीपासून जाणून घ्या. कंपनीच्या मोटारींबरोबरच त्यांचे सुटेभाग, सेवा केंद्रे, तेथील वातावरण या सर्व बाबींबरोबरच अन्य संलग्न असणार्‍या सामग्रींचा व त्यांच्या अन्य कंपनीने मोटारीत अंतर्भूत केलेल्या घटकांचा आढावा घ्या. काहीवेळा मोटार उत्पादक कंपनी त्या विशिष्ट भागाबाबत जबाबदार नसते. तर ती ज्या अन्य कंपनीने तयार केलेली असते, त्या कंपनीची ती जबाबदारी म्हणून टाकली जाते. तेथे मोटार उत्पादक कंपनी केवळ ब्रॅण्ड म्हणून त्या वस्तुंचा वापर करत असते. त्याच कंपन्यांचे भाग तुम्ही घ्यायला पाहिजेत अशी अट असत नाही. त्यामुळे उत्पादक म्हणून कंपनी संलग्न अन्य घटकही कसे असतात ते लक्षात घ्या. ज्यामध्ये टायर कंपनी, सेंट्रलडोअर लॉकिंग उत्पादन, म्युझिक सिस्टिम आदी प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे. मोटारीतील हे घटकही देखभालीबाबत लक्षात ठेवणे आवश्यक असते. एकूणच देखभाल ही केवळ तुमच्या एका मोटारीसंबंधात नव्हे तर तुमच्या आनंदाशी, सुरक्षिततेशी निगडित असते.

***

 

 

http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/four-wheeler-garage-wegvan.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/four-wheeler-garage-wegvan-150x150.jpgadminदेखभालcar,dashboard,engine,garages,hatchback,maintance,mat,motor,sedan,service,service centre,spare parts,tyres
मोटारीची देखभाल – २   गॅरेज, रस्ते, हवामानआदींबद्दलही पूर्ण लक्ष हवे ----- मोटारीची देखभाल ही सर्वात महत्त्वाची असते. या देखभालीमध्ये अनेक घटक समाविष्ट असतात. मोटार विकत घेण्याआधी व घेताना त्याबद्दल पूर्ण विचार करूनच मोटार खरेदी करावी, ज्यामुळे भविष्यात देखभालीपाठी धावाधाव करावी लागणार नाही. देखभालीविषयी काही महत्त्वाच्या घटकांचा मोटारीची देखभाल - १  मध्ये  विचार केला...