निमित्तमात्र…
जागतिक दर्जाच्या एनसीएपी या संस्थेने मोटारींच्या सुरक्षिततेविषयी भारतातील काही मोटार कंपन्यांच्या मोटारींची ‘क्रॅश टेस्ट’ म्हणजे अपघात चाचणी घेतली. या चाचणीमध्ये मारुतीच्या ‘स्विफ्ट’ व ‘निसान डॅटसन’ गो या मोटारी नापास झाल्या. पण आपण यातून काय शिकलो व काय शिकले पाहिजे, यावर केलेला हा निमित्तमात्र… उहापोह
मध्यंतरी जागतिक दर्जाच्या एनसीएपी या संस्थेने मोटारींच्या सुरक्षिततेविषयी भारतातील काही मोटार कंपन्यांच्या मोटारींची ‘क्रॅश टेस्ट’ म्हणजे अपघात चाचणी घेतली. या चाचणीमध्ये मारुतीच्या ‘स्विफ्ट’ व ‘निसान डॅटसन गो’ या मोटारी नापास झाल्या. त्यानंतर तर या संस्थेने डॅटसन गो’ ही मोटार कंपनीने बाजारामधून परत घ्यावी, थोडक्यात ती गाडी विकू नये, अशी सूचना केली होती. गाड्यांच्या टक्करीमध्ये व अपघातामध्ये काय प्रकारचे गाडीचे नुकसान होते, त्यामध्ये आतील प्रवाशावर काय परिणाम होऊ शकतात, तो जगू शकेल का, त्याला इजा झाली तर ती किती गंभीर असू शकते व या सर्वांमधून मोटार सुरक्षिततेच्या दृष्टीने खरोखरच चांगली आहे का, अशा प्रकारची ही चाचणी होती. wegvan crash test datsun swiftत्याचप्रमाणे मोटारीमध्ये एअरबॅगसारखी सुरक्षा साधने असतात व ती असली तर त्यामुळे किती प्रमाणात प्रवाशाला वाचविण्याचे काम होऊ शकते, अशा सर्व प्रकारातून घेण्यात आलेली चाचणी, या एनसीएपी संस्थेने घेतली. या चाचण्या जागतिक दर्जाच्या होत्या भारतात मात्र तशी नियमावली नाही, येथील नियम वेगळे आहेत. त्या नियमांना अनुसरून आम्ही मोटारी बनवितो व त्या येथे लागू असलेल्या नियमांना धरून आहेत. असे सर्वसाधारणपणे भारतातील या मोटार उत्पादकांचे म्हणणे आहे. हे म्हणणे किती चूक आहे वा किती बरोबर आहे वा किती तार्किक आहे या वादामध्ये कोणी पडत नाही. खरे पाहाता येथे ग्राहकांना योग्यरीत्या प्रतिनिधीत्व देणारी कोणी एखादी संघटना आहे का असा प्रश्न पडतो.
या दरम्यानच्या काळात,’ डॅटसन गो ‘ही मोटार काही बाजारातून माघारी बोलाविण्यात आलेली नाही. तर गुजरातमधील गांधीनगरमध्ये एका मोटार प्रदर्शनीत मारुती सुझुकी इंडिया लि. चे कार्यकारी संचालक आर. एस. कलसी यांनी या अनुषंगाने पत्रकारांशी झालेल्या चर्चेत सांगितले की, आम्ही सरकारने ठरविलेल्या सुरक्षा विषयक निकषांचे पालन करतो. एनसीएपी या संस्थेने जी ‘क्रॅश टेस्ट’ घेतली होती ती आंतरराष्ट्रीय दर्जाची त्या निकषानुसार घेतली होती. आम्ही जे नियम पाळतो, ते भारतीय सरकारने घालून दिलेले आहेत, ते आम्ही मोटार उत्पादन करताना लागू करतो. आमचीही इच्छा ते बदलण्याची आहे. सरकार जर तयार असेल तर आम्ही त्या बदललेल्या सुरक्षा नियमांचे पालन करू.
‘नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्टिंग अँण्ड आर. एन. डी प्रोजेक्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व आय.ए.एस. अधिकारी असलेले नितिन गोकर्ण यांनी भारतातील सुरक्षा विषयक नियमांचे समर्थन केले. ते म्हणाले की, ज्यांनी ही चाचणी घेतली ती मोटारीचा वेग ताशी ६४ किलोमीटर असताना घेतली. भारतात हे परिमाण नाही. तर ताशी ५४ किलोमीटर इतक्या वेगामध्ये येथे चाचणी घेतली जाते. भारतात ठरवून दिलेल्या वेगानुसार ही चाचणी घेतली जाते इतक्या उच्च वेगामध्ये ही चाचणी घेतली जात नाही.
या दोन्ही व्यक्तींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहाता अनेक प्रश्न पडण्याची आवश्यकता आहे. ते प्रश्न कोणते, त्यापैकी किती प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरित आहेत व अनुत्तरित राहाणार आहेत, ही बाब खरोखर गांभीर्याने विचार करण्याची आहे. नव्हे तर तशी वेळ नक्की आली आहे. याचे कारण नवे केंद्र सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतातील वाहनविषयक कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची इच्छा व्यक्त केली गेली. नितिन गडकरी यांच्यासारख्या रस्ते निर्माण करण्याच्या कामात अनुभवी ठरलेल्या मंत्र्यालाच संबंधित खाते मिळाल्याने त्याविषयक काही बाबी गांभीर्याने त्यांनी घेतल्या हे महत्त्वाचे खरे. मात्र, हे सारे बदल कधी होणार, ते लोकांना पचणार की नाहीत, लोक ते स्वीकारतील का, विरोधक किती स्वीकारतील आदी अनेक प्रश्न त्यात आहेत. त्यापेक्षाही महत्त्वाचेही प्रश्न जे विद्यमान स्वरुपातच दिसतात त्यांचे काय. कारण मारुती सुझुकीच्या कार्यकारी संचालकांच्या म्हणण्यानुसार भारतीय निकषांचे पालन आम्ही करीत आहोत, या वाक्यात ब-याच बाबी अंतर्भूत आहेत. त्यामध्ये केवळ मोटार उत्पादक कंपनीच नव्हे तर मोटार वापरणारे भारतीय नागरिकही कारणीभूत दिसतात. विशेष करून अपघातासारख्या गोष्टींमध्ये लोकांनीही नियम पाळायला हवेत, ते किती पाळतात हा प्रश्न आहे.. दुसरी बाब नियम पाळण्याची त्यांची मानसिकता ही कंपनीनेही बदललेली आहे. गतीमानतेबाबत जाहिरातबाजी करून, मोटारीच्या वापराबाबत ज्या पद्धतीने उत्पादन विक्रीच फक्त नजरेसमोर ठेवली जाते त्याचे काय हा ही प्रश्न आहे. या जाहिराती दाखविताना अनेक अंगांचा विचार करावा लागतो. त्यात केवळ कंपनीचा फायदा होईल असे काही दाखविणे किती योग्य आहे, याचाही विचार जनतेने करायला हवा. त्यासाठी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. नवीन पिढीला असणारे वेगाचे वेड हे कमी करण्याचे काम या जाहिराती करीत नाहीत. मोटारीचा जाहिरातीमध्ये दाखविलेला वेग कमी किती अधिक किती इतकीच बाब येथे अभिप्रेत नाही. तर त्या मोटारीच्या संबंधातील चित्रे, त्यांची पार्श्वभूमी व त्यामुळे होणारा मानसिक परिणामही लक्षात घ्यायला हवा. तो घेतला जात नाही.
यासंबंधात खालील मुद्दे विचारात घेण्यासारखे आहेत.
——————————————————-
मोटार उत्पादक कंपनी व वाहतूक व वाहन सुरक्षितताविषयक नियम यांचे परस्परसंबंध
मोटार उत्पादक कंपनी खरोखरच सुरक्षितताविषयक उपकरणांची नीट माहिती देते का
अपघातानंतर व अपघात होऊ नये यासाठी काय प्रकारे ग्राहक जागृती करते
पोलीस व वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणारे सरकारी घटक
नियमांची अंमलबजावणी व त्याबाबत सुजाणता असणारी जनतेची मानसिकता किती आहे.
भारतातील ब-याच मोटार उत्पादक कंपन्या या मूळ परदेशी आहेत. त्यांचे हवालेही ते येथे मोटार विक्री-विपणनात देतात.
परदेशातील महात्म्य सांगताना या कंपन्या येथे काय प्रतीचा माल व निकष पाळतात.
कालानुसार मोटार उत्पादकांनी कॉस्ट कटिंग करताना काय घसरण केली आहे, त्यांनी आरेखन, दर्जा कसा पाळला आहे.
विमा कंपन्यांनी विमा उतरविताना मग कोणता निकष पाहिला आहे, की केवळ व्यावसायिक दृष्टी आहे.
विमा कंपन्यांमध्येही आता खाजगीकरण वा जागतिकीकरण असताना जागतिक कंपन्यांनी भारतीय नियमांचा मग फायदा घेतला का गैरफायदा.
ग्राहकांमधील अनेक जण वाहतुकीचे नियम किती पाळतात
रस्त्यांच्यादृष्टीने व वाढत्या वाहतूक व मोटारींच्या संख्येच्या तुलनेचा विचार करता त्याचे काय परिणाम होतात.
मोटार ही नेमकी कशासाठी घेतली जाते, त्या मागचा विचार समाजात नेमका काय आहे.
मोटार मालकी व मोटार चालन याचे भान लोकांना आहे का,
जागतिकीकरणाचा फायदा घेत भारतात स्थिरावणा-या कंपन्या जागतिक दर्जा इथे का विसरल्या
त्यांनी सरकारला किती प्रकारच्या सूचना केल्या, ग्राहकांना खरोखरच किंमतीचे रास्त रूप दिले का,
वाहन सुरक्षितता ही भारतात व बाहेर वेगळी आहे असे या कंपन्याही का मानतात.
या मुद्यांप्रमाणे अन्य अनेक विषय वा मुद्दे येतील. पण त्याचा विचार खरोखरच गांभीर्याने करण्याची वेळ आली आहे. नुसता विचार नव्हे तर किमान नियमांची अंमलबजावणी आपण करीत आहोत का, याचा विचार प्रत्येक ग्राहकाने करायला हवा. तशी कृती व सुजाणता जोपर्यंत निर्माण होत नाही, लोकांच्या मानसिकतेत बसत नाही तोपर्यंत वाहन सुरक्षिततेबाबत जागतिकीकरणाचा दर्जा वाहन उद्योगाने भारतात प्राप्त केला तरी ख-या अर्थाने तो रूढ होऊ शकणार नाही. उद्योगांच्या मानसिकतेबरोबरच ग्राहकांची व नागरिकांची मानसिकताही बदलणे गरजेचे आहे.
http://wegvan.in/wp-content/uploads/2014/11/wvcrashtestdatsun1.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/11/wvcrashtestdatsun1-150x150.jpgadminनिमित्तमात्र...airbag,auto,crash test,datsun go,global standard,maruti swift,ncap,security,vehicle rules
निमित्तमात्र... जागतिक दर्जाच्या एनसीएपी या संस्थेने मोटारींच्या सुरक्षिततेविषयी भारतातील काही मोटार कंपन्यांच्या मोटारींची 'क्रॅश टेस्ट' म्हणजे अपघात चाचणी घेतली. या चाचणीमध्ये मारुतीच्या 'स्विफ्ट' व 'निसान डॅटसन' गो या मोटारी नापास झाल्या. पण आपण यातून काय शिकलो व काय शिकले पाहिजे, यावर केलेला हा निमित्तमात्र... उहापोह मध्यंतरी जागतिक दर्जाच्या एनसीएपी या संस्थेने...