आज शहरी व निमशहरी भागांमध्ये स्कूटर्स, मोटारसायकली यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. विविध आर्थिक गटांसाठी दुचाकी ही या भागातील गरज बनली आहे. कारणे काहीही असली तरी ही बाब नाकारता येत नाही. अगदी ग्रामीण भागातही मध्यमवर्गीय नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी यांना दुचाकीची आवश्यकता भासते. त्यांचा वापर विविध पद्धतीने, अनेक कारणांसाठीही केला जातो. किंबहुना भारतातील एकूण जीवनशैलीवर दुचाकींच्या अस्तित्त्वाने मोठा परिणाम साधला आहे. प्रत्येक ग्राहकाने दुचाकी कोणती व कशासाठी घ्यावी यासाठी मात्र आपल्या वापरांतर्गत असणार्‍या रस्त्यांचा, वातावरणाचा, गरजांचा पूर्ण विचार करून मगच दुचाकीची निवड करावी, जी त्याला नक्कीच किफायतशीर पडू शकेल.
शहरी व निमशहरी भागातील गरज
दुचाकी आज शहरी व निमग्रामीण वा निमशहरी भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला आहे. या भागांमध्ये दुचाकी ज्या कारणासाठी घेण्यात येते, त्या कारणांमध्ये भागांनुसार काही फरक पडतो. त्यामुळेच वरील परिसरात दुचाकी वापर करण्यासाठी असलेल्या वातावरणात, स्थितीत असणारा फरक लक्षात घेऊन त्याचप्रमाणे आपल्या गरजा लक्षात घेऊन दुचाकीमधील मोटारसायकल, स्कूटर की स्कूटी घ्यावी हा विचार करण्याची प्रथम गरज प्रत्येक ग्राहकाने लक्षात घेतली पाहिजे. आज दुचाकींच्या एकंदर किंमतीचा विचार करता या किंमती किमान 50 हजार रुपयांच्या वर जातात. ही रक्कम सर्वांना सहज परवडणारी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळेच दुचाकी खरेदी करतानाही आपल्याला कोणती दुचाकी योग्य आहे, स्कूटर की मोटारसायकल, तिचा टिकाऊपणा किती आहे, तिच्या सुट्या भागांची उपलब्धता, देखभाल सेवा केंद्रांची, खासगी मेकॅनिक्सची उपलब्धता आणि किफायतशीरपणा आहे का याचाही पूर्ण विचार सुरुवातीपासूनच केला गेला, तर नंतर पस्ताविण्याची वेळ येणार नाही.
 शहरी व निमशहरी, ग्रामीण वा निमग्रामीण भागांमध्ये विविध कारणांसाठी दुचाकींचा वापर होतो. सर्वप्रथम आपण या वापराबाबत वा उपयुक्ततेबाबत विचार करू.
ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची स्थिती अनेक ठिकाणी फार चांगली असल्याचे दिसत नाही. ग्रामीण भागात शेतकरी वा अन्य व्यावसायिकांकडून दुचाकी वापरल्या जातात. नोकरदारांप्रमाणे त्यांच्याकडून होणारा वापर हा काहीसा वेगळा असतो. आरटीओचे नियम अजूनही अनेक ठिकाणी लागलेले दिसत नाहीत. किंबहुना लोकांकडून ते धुडकावलेही जातात. त्यामुळे दुचाकीला अन्य काही जोडण्याही करण्यात येतात. त्यांचे प्रमाण ग्रामीण भागात व निमग्रामीण भागात दिसून येते. सामान वाहून नेण्यासाठी दुचाकीचा वापर केला जातो, ही बाब ग्रामीण भागात सर्रास आहे. त्यात गैर आहे असे कोणालाही वाटत नाही. अशा प्रकारे तेथे वापरण्यात येणारे दुचाकीचे रुप आहे. त्यांचा वापर ज्या पद्धतीने होतो, ती बाब येथे चर्चेची नाही. मात्र लोकांच्या या प्रकारच्या वापराचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते, की रस्ते, वापर या दृष्टीने येथे लागणारी दुचाकी ही त्यांच्यासाठी मजबूत, किफायतशीर आणि टिकाऊही हवी. अशा प्रकारात दुचाकीमधील मोटारसायकल ही काहींना व्यावसायिक दृष्टीच्या वापरामुळे फायदेशीर ठरू शकेल. हे जरी खरे असले तरी त्या मोटारसायकलीचे सुटे भाग व देखभालीची सोय नीट मिळायला हवी. तिचा वापरही नीटपणे व्हायला हवा. अन्यथा ती दोन-तीन वर्षांमध्येच विकावी अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
स्कूटर हा त्या ठिकाणी पर्याय होईल असे नाही. सध्याच्या स्कूटर्स या पूर्वीच्यासारख्या मजबूत नाहीत. मात्र त्यांचे मायलेज पूर्वीच्या टू स्ट्रोक स्कूटर्सपेक्षा वाढलेले आहे. प्रामुख्याने स्कूटर्समध्ये प्लॅस्टिक किंवा फायबरचा वापर अधिक होत असल्याने त्यांच्या टिकाऊपणात कदाचित खार्‍या हवेचा वाईट परिणाम न झाल्याने फायदेशीर ठरत असतील, पण त्यांच्या मजबुतीबाबत मात्र तितकी खात्री देता येत नाही. अर्थात शहरी पद्धतीच्या वापरानुसार स्कूटर्स या महिलांसाठी आता अधिक प्राधान्याने विक्रीसाठी मांडण्यात येत आहेत. या स्कूटर्स केवळ महिलाच नव्हेत तर पुरूषांनाही तितक्याच उपयुक्त आहेत, सुलभपणे हाताळण्यासारख्या आहेत. मात्र अवजड सामानसुमान वाहून नेण्यासाठी त्यांच्यापेक्षा मोटारसायकलींचा वापर आज अधिक होताना दिसतो. यामुळे ग्रामीण भागात मोटारसायकलींचा वापर किफायती होतो. दुसरी बाब म्हणजे मोटारसायकलींची चाके ही मोठी असल्याने खडकाळ रस्त्यावर त्या चालविताना स्कूटरपेक्षा अधिक प्रभावी कामगिरी त्या करू शकतात. सस्पेंशन पुढे व मागे दोन्हीबाजूला असणारे असल्याने धक्क्यांचे प्रमाणही कमी असते.
यामुळे दूध व्यावसायिक, अंडी व्यावसायिक, दुकानदार, भाजीपाला शेतकरी व विक्रेतेही मोटारसायकलींना अधिक पसंती देतात. स्कूटरपेक्षा मायलेजही मोटारसायकलचे अधिक मिळत असल्याने पसंतीला उतरणार्‍या दुचाकींमध्ये मोटारसायकल व त्या प्रकारावर आधारित काही मोपेड्स ग्रामीण भागात पसंत केल्या जातात.
निमग्रामीण व निमशहरी भाग आज शहरीकरणाच्या पायरीमधील एक टप्पा बनला आहे. ग्रामीण भागापेक्षा तेथील जीवनशैली वेगळी होत चालली आहे. खास करून तालुक्याची शहरे, त्या तालुका शहराचा परिसर किंवा ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या औद्योगिक वसाहती व परिसर या प्रकारांचा समावेश असणारी ही लोकवस्ती. येथील जीवनशैलीनुसार मोटारसायकल, स्कूटर्स अशा दोन्ही प्रकारांबरोबरच मोपेड्स वा स्कुटी यांचाही वापर येथे मोठ्या प्रमाणात केला जातो. मायलेज, काहीशा मध्यम लांबीच्या प्रवासातील सुलभपणा, गती, आरामदायी आसन आदी बाबी येथे प्रामुख्याने ग्राहकांना अपेक्षित असतात. या भागातील रस्ते फार खराब नसले तरी फार चांगले असतात, असेही नाही. मात्र वाहतूक वर्दळ असल्याने व बाजारभागात वा सरकारी कार्यालये असणार्‍या ठिकाणी असणारे रस्ते, हे प्रामुख्याने या भागातील लोकांचे रोजचे ठिकाण असते. साहजिक येथील रस्त्यांची स्थिती व वाहतुकीचा वेग याचा विचार करता तेथे मायलेज जरी मिळाले नाही, तरी अन्य रस्त्यांवर ते मिळू शकते. त्याचप्रमाणे विक्रीनंतरची सेवाही बर्‍यापैकी असते, ग्राहकही आपल्या वाहनांबाबत तसा चोखंदळ आणि दक्ष असतो. यामुळे तेथील दुचाकींचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो. प्रामुख्याने नोदरदार, व्यापारी वर्ग व व्यावसायिक यांच्याकडून असणारा येथील दुचाकींचा वापर वैविध्यपूर्ण असतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार प्रभावी नसल्याने दुचाकी हा या परिसरामधील किमान १० ते ३० किलोमीटरच्या परिघातील दळणवळणाचे महत्त्वाचा दुवा आहे. येथील महिलांचाही दुचाकीचा वापर प्रामुख्याने वाढलेला असल्याने स्कूटर्स व स्कुटी यांना मागणी असते.
शहरी भागामध्ये आज दोन गट केले तरी महानगर व त्यांची संलग्न उपनगरे यात फार फरक राहिलेला नाही. सर्वसाधारण मोठी शहरे व त्यांची उपनगरे यामधील अंतर किमान ५० ते ७० किलोमीटरपर्यंत मानले तरी येथे विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर मुंबईसारखी शहरे देखील अवाढव्य रूप धारण करू लागली आहेत त्यामुळे दुचाकी सर्वमान्य वाहन होत झाले आहे. स्वयंचलित वाहनांना आता अत्यावश्यक गरजेमध्ये मानले गेले आहे, इतकी स्थिती आल्याने शहरामध्ये दुचाकींवर जीवन अवलंबून राहिले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरत नाही.
शहरांमध्ये मायलेज किती मिळते हे आज पाहिले जात नाही. सोयीस्करपणा हा प्रत्येकाच्या सोयीनुसार ठरत असल्याने मोटारसायकली व स्कूटर यांचे प्रमाण जवळजवळ सारखे आहे. यामुळेच शहरी भागात दुचाकींमध्ये असलेली स्पर्धा मात्र दिसते. विविध कंपन्यांच्या दुचाकींची रूपे, त्यांचे शक्तीनुसार असणारे गट येथे पाहावयास मिळतात. अधिक ताकदीच्या इंजिनाची मोटारसायकलही येथे दिसते व १०० सीसी ताकदीच्या इंजिनाची मोटारसायकलही येथे दिसते. क्रयशक्ती असल्याने मोटारसायकलींची ही श्रेणीनिहाय वर्गवारी शहरात दिसून येते. वास्तविक गरज नसतानाही अधिक ताकदीच्या इंजिनांच्या मोटारसायकलींना केवळ क्रेझ, प्रेस्टिज म्हणून घेतले जाते.
मोटारसायकलींचे हे स्वरूप दिवसेंदिवस स्पर्धात्मक होत असून नवनव्या मॉडेल्सची भुरळ विशेष करून तरुणांना पडली आहे. स्कूटर्सच्या कंपन्याही आता वाढल्या आहेत व त्यांच्या मॉडेल्सची आवृत्तीही वाढत आहे. दुचाकींचा हा प्रभाव लक्षात घेता प्रत्येक ग्राहकाने आपला वापर, उपयोग, आर्थिक ताकद व प्रवासाचे दैनंदिन किलोमीटर किती असतील, याचा विचार करूनच दुचाकीची निवड करावी.
क्रमश:

http://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooters-wv-3-831x10241.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooters-wv-3-831x10241-150x150.jpgadminदुचाकीmoterbike,rto,scooter,sctooty,two wheelers
आज शहरी व निमशहरी भागांमध्ये स्कूटर्स, मोटारसायकली यांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. विविध आर्थिक गटांसाठी दुचाकी ही या भागातील गरज बनली आहे. कारणे काहीही असली तरी ही बाब नाकारता येत नाही. अगदी ग्रामीण भागातही मध्यमवर्गीय नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी यांना दुचाकीची आवश्यकता भासते. त्यांचा वापर विविध पद्धतीने, अनेक कारणांसाठीही केला...