दुचाकी हे सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. अशा या दुचाकीच्या वापराची जणू जीवनशैलीच बनली आहे. पण, ही जीवनशैली त्रासदायक होता कामा नये, यासाठी त्या दुचाकीची नियमित देखभाल होणे मात्र अतिआवश्यक आहे हे प्रत्येक दुचाकी मालकाने लक्षात घ्यायला हवे.
दुचाकीचे आयुष्य वाढविणारी ’देखभाल’
मोटारसायकल व स्कूटर, मोपेड या दुचाकी सदरात मोडणार्‍या स्वयंचलित वाहनांचा किफायतशीरपणा हा केवळ त्या मायलेज किती देतात यावर समजून घेणे अयोग्य राहील. याचे कारण दुचाकी या विविध प्रकारच्या रस्त्यांवर वापरल्या जात असतात, त्यामुळे त्या नेमके किती मायलेज देतात, हे सांगणे तसे कठीण असते. दुचाकीचा वापर करताना त्यावर होणारा खर्च हा या किफायतशीरपणा लक्षात घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. यामुळेच तो खर्च केवळ मायलेज या एका घटकावर अवलंबून नाही. हे घटक म्हणजे केवळ मायलेज नाही, त्यात सस्पेंशन, टायर्स, चेन, ऑइलचा वापर, अगदी साधी बाब म्हणजे स्कूटरचा स्टँड हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक असतो. सायलेन्सर हा देखील त्याच घटकामध्ये मोटतो. थोडक्यात तुम्ही दुचाकी वापरत असताना या सार्‍या घटकांची काळजी घ्याल व त्यावर योग्य तितके लक्ष द्याल तितका तुमच्या दुचाकीचा किफायतशीरपणा वाढणार आहे. अन्यथा एखाद दिवशी खर्चाचा बसणारा फटका हा अधिक असू शकतो आणि केवळ मायलेजवर गणला जाणारा किफायतशीरपणा क्षणार्धात महाग वाटायला लागतो.
या सार्‍या बाबी सांगण्याचे कारण म्हणजे किफायतशीरपणा चांगला राहावा यासाठी तुम्ही तुमच्या दुचाकीची देखभाल नीट करणे अभिप्रेत आहे. देखभालीमध्ये नेमके काय करावे, असाही प्रश्‍न काहींना पडू शकतो. तत्पूर्वी एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे मोटारसायकल वा स्कूटर मायलेज कमी द्यायला लागली, असे वाटते व ती तीन वर्षांमध्ये विकून टाकण्याची वेळ येते. परंतु ते योग्य नाही. केवळ पेट्रोलवर होणारा खर्च किती इतकेच विचारात घेता कामा नये. त्यावर किफायतशीरपणा गणला जाऊ नये. अन्यथा दर दोन वर्षांनंतर दुचाकी विकण्याची इच्छा होईल व त्यातून कोणताच किफायतशीरपणा सिद्ध होणार नाही.
दुचाकींमध्ये स्कूटर वा स्कुटरेटपेक्षा मोटारसायकलींचे पेट्रोलसंलग्न काम हे अधिक प्रभावी असते. मोटारसायकल मायलेज जास्त देते. स्कूटर कमी देते. ही बाब उघड आहे. याची कारणे काही असली तरी दोन्ही वस्तू या भिन्न आहेत. त्यांची रचना, उपयुक्ततेच्या बाबी या स्वतंत्र स्थानी आहेत. तितक्याच त्या महत्त्वाच्या व लक्षणीय आहेत. त्यांची तुलना त्या आधारे करू नये.
तुमची गरज पूर्ण करण्याचे ते साधन असले तरी त्यासाठी तुमची दळणवळण वा प्रवासाची नेमकी गरज ओळखली तर ही बाब नेमकी सूक्ष्मपणे लक्षात येईल. दुचाकींमधील या दोन भिन्न प्रकारच्या वाहनांसंबंधातील वैशिष्ट्ये यापूर्वी लेखांमध्ये आली आहेतच.
आज या दोन्ही प्रकारातील दुचाकी उपयुक्त आहेत. त्या त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आणि लोकांना उपयुक्तही वाटत आहेत. रस्त्यांची स्थिती, वाहतुकीची स्थिती ही एक महत्त्वाची बाब आहे. वर्दळीच्या ठिकाणी, अधिक सिग्नल्स असणार्‍या शहरी वाहतुकीमध्ये आणि खराब रस्ते असणार्‍या ठिकाणी तुमची दुचाकी मायलेज कमी देते. सलग व सातत्याने गीयर्स बदल होणे, क्लचचा वापर होणे किंवा वेग कमी अधिक करण्यासाठी एक्सलरेशन कमी अधिक वाढविणे कमी करणे ही क्रिया होणे यामुळे मायलेज कमी होणार. त्यात तुम्ही अनावश्यकरीतीने वेग वाढवू नका, किंवा गरज नसेल तेव्हा दुचाकीचे इंजिन चालू ठेवू नका, विनाकारण एक्सलरेशन देऊ नका. ही कृती देखभाल खर्च कमी करणारी, किफायतशीरपणा देण्यातील पहिली पायरी आहे. सर्वसाधारण सरळसोट रस्ता, चांगला रस्ता, सलग वेग राखून चालविता येण्यासारखी असणारी स्थिती पेट्रोल बचतीसाठई उपयुक्त असते. याचा अर्थ अतिवेगाने दुचाकी चालविली तरीही मायलेज चांगले मिळेल असा नाही. सर्वसाधारण दुचाकीची गती ही प्रति ताशी ४० ते ५५ किलोमीटर राखा, उत्तम मायलेज मिळण्यासाठी गती ही प्रति ताशी ४० ते ४५  किलोमीटर ठेवा.
रस्त्यांची स्थिती कशी आहे हे पाहिले तर खड्ड्यांमध्ये जोरदारपणे धडकवून दुचाकी रेटणे केव्हाही वाईट. अशा प्रकारे सातत्याने दुचाकी चालविली तर सस्पेंशनवर जसा दुष्परिणाम होतो, तसाच टायरवर, सुरक्षिततेवर, अगदी वेगवेगळे भाग जोडणार्‍या नटबोल्डवरही होत असतो. यामुळेच वाहन चालवितानाही काळजीपूर्वक चालविले तर देखभालीवरील खर्चही कमी होऊ शकतो, त्या त्या भागांचे आयुष्य वाढू शकते.
अनावश्यक वेग वाढविणे, चढावावर, उतारावर गीयरचे प्रमाण नीट ठेवणे ही बाबही इंजिनवर ताण कसा येतो, ते नियंत्रित करणारी असते. त्यामुळे इंजिन टिकाऊ व कार्यक्षम बनते. मायलेजही चांगले राहाते. या प्रमाणेच तुमच्या परिसराचे हवामान लक्षात घेऊन त्या दुचाकीची निगा राखा. दमट वा खारट हवामानाच्या परिसरात दुचाकी पाण्याने सातत्याने धुण्याची कृती कमी करा. आवश्यक तेव्हा ओलसर फडक्याने पुसा. धूळ झाडून घ्या. इंजिन ऑइल, ग्रीस यांचा सुयोग्य वापर करा. त्यामुळे सहजसुंदर वाहनचालनाचाही अनुभव मिळेल व दुचाकीचे आयुष्यही वाढेल. वंगण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, तो नियमित तपासा.
टायरमधील हवा योग्य ठेवणे, जुने टायर्स वेळीच बदलणे, ब्रेक्सची तपासणी व योग्यवेळी त्यातील बदल, इनर व आऊटर केबल्सची तपासणी व बदल या सर्व बाबी नियमित तपासण्याने व बदलण्याने तुमच्या खिशाला त्रास वाटला तरी भविष्यामधील अधिक खर्च टाळण्यासाठी व मायलेजही नीट राहून तुमची दुचाकी किफायतशीर ठरण्यास उपयुक्त असतील अशा बाबी आहेत. केवळ किफायतशीरपणा नव्हे तर सुरक्षितपणाही त्यामुळेच तुम्हाला लाभू शकेल.

 

http://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooter-wv-4-e14228484535561.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/02/scooter-wv-4-e14228484535561-150x150.jpgadminदुचाकीmaintance,milege,motorbike,scooter,service
दुचाकी हे सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. अशा या दुचाकीच्या वापराची जणू जीवनशैलीच बनली आहे. पण, ही जीवनशैली त्रासदायक होता कामा नये, यासाठी त्या दुचाकीची नियमित देखभाल होणे मात्र अतिआवश्यक आहे हे प्रत्येक दुचाकी मालकाने लक्षात घ्यायला हवे. दुचाकीचे आयुष्य वाढविणारी ’देखभाल’ मोटारसायकल व स्कूटर, मोपेड या दुचाकी सदरात...