गेल्या काही महिन्यांपासून मोटार उद्योगाला तसे काहीसे मंदीने, वाढत्या उत्पादनमूल्याने, करवाढीने आणि इंधनदरवाढीने ग्रासले आहे. तरीही मोटार उद्योगातील विविध कंपन्यांनी आपली नवी नवी मॉडेल्स भारतीय ग्राहकांपुढे ठेवली आहेत. अर्थात हे न संपणारे आहे. महागाई तशी नवीन बाब राहिलेली नाही. समजातील एका विशिष्ट वर्गाच्या दृष्टीने ही महागाई नित्याची समजली जाते असेच म्हणावे लागते. काही असले तरी सण आला की मोटार खरेदीचे दिवस सुगीचे असतात. शोरूम्समध्ये रोषणाई, सजावट आणि त्याबरोबरीने मोटार खरेदीदाराला आकर्षक अशा सवलतींचा, भेटवस्तूंचा मोह पाडण्याचे काम केले जाते. मोटारींच्या उलाढालीसाठी सणासुदीचा काळ हे सुवर्णपर्वच असते. या सणासुदींच्या निमित्ताने मोटार खरेदी करताना मात्र खरेदीदाराने मुळात असल्या मोहात न पडता मोटार कोणती खरेदी करायची याचे काही निकष स्वत:च ठरवायला हवेत.  कोणत्या कंपनीची मोटार तुम्हाला चांगली वाटते, ती का चांगली वाटते, तुमच्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत, की ज्यामुळे तुम्हाला तुमची मोटार निवडताना त्या निकषांप्रत एखादे मॉडेल पोहोचू शकते. हे सारे तुम्हीच ठरवायचे असते.

मोटार ही मालमत्ता नाही हे नीट ध्यानात घ्या. मोटार म्हणजे सोने, बँकेतील डिपॉझिटची योजना वा शेअर मार्केटची गुंतवणूकही नाही. मोटार ही टुरिस्ट व्यावसायिकांची गुंतवणूक आहे. सर्वसाधारण ग्राहकाच्या दृष्टीने मोटार म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सुलभपणे, आरामदायीपणे जाण्याचे एक साधन आहे. तो एक सौख्यदायी अनुभव आहे. ते सौख्य तुम्हाला किती काळ अनुभवायचे आहे, किती किंमत तुम्ही त्यासाठी मोजू इच्छिता त्यावर तुम्ही कोणती मोटार तुमच्या मालकीची करणार आहात ते अवलंबून असू द्या. वाढती महागाई सर्वानाच त्रासदायी आहे. तरीही एकेकाळची चैन म्हटली जाणारी ही मोटार आज समाजातील काही वर्गाची (आर्थिक गटाची) गरज बनली आहे. काही वर्गाच्या दृष्टीने तर मोटारींचे ताफे बाळगणे हीदेखील फार मोठी बाब नाही. चांगल्या पॅकेजवर काम करणारा नोकरदार आणि सर्वसाधारण पॅकेजवर काम करणारा नोकरदार वा त्या उत्पन्न गटातील ग्राहक असा विचार करता उच्चमध्यमवर्गीयांमधील दोन गट तयार झालेले दिसतात. त्यापैकी एक गट असा असतो की त्याला कोणत्या कंपनीची मोटार चांगली आहे यापेक्षा कोणत्या कंपनीची मोटार घेतली म्हणजे प्रेस्टिज वाढेल याची चिंता असते. तर दुसरा गट असा आहे की, त्याला मोटारीसाठी पैसा देतो त्याची किंमत मोजतो त्याचे मूल्य पुरेपूर हवे असते. मोटारीचे सुख खर्‍या अर्थाने त्याला हवे असते. सेकंडहॅण्ड मोटार घेण्याकडेही ग्राहकांचा कल असतो. मात्र त्यासाठी त्याने अनेक बाबी लक्षात घ्यायला हव्या. असणारी मोटार काढून दुसरी नवी मोटार घेणारे वा काही काळासाठी सेकंडहॅण्ड मोटार घेणारे ग्राहक आहेत. एकंदर पहिली मोटार काढून दुसरी घेताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
तुमच्या मोटारीच्या या व्यवहारात काय पाहावे?
तुमच्या मोटारीला किती वर्षे झाली आहेत
मायलेज कमी देत आहे का,
त्यावर त्यासाठी दुरुस्तीवर अधिक खर्च होत आहे का,
तुमच्या मोटारीला बाजारात रिसेल व्हॅल्यू त्या मोटारीच्या मॉडेलच्या दृष्टीने कमी आहे का, त्याबद्दल तुम्ही चौकशी केली आहे का,
मोटार घेताना तुम्हाला असलेल्या अपेक्षा आता पुर्‍या होत नाहीत का,
तुम्ही मोटार किती वापरली आहे,
मोटारीचा वापर अधिक करण्यास विद्यमान मोटार अपुरी वाटते का,
विद्यमान मोटार हॅचबॅक आहे व तुम्हाला त्यापेक्षा मोठी मोटार घ्यावीशी वाटते का, तशी ती तुम्हाला गरजेची वाटते का,
मोटारीवर आणखी खर्च करण्यापेक्षा नवीन मोटार घेणे तुम्हाला किफायतशीर वाटते का,
मोटार नवीन घेणार आहात तर त्यासाठीही तुम्ही तुमचा उत्सवाचा उत्साह काहीसा बाजूला ठेवून वस्तुनिष्ठपणे विचार करावा. मला जी नवी मोटार घ्यायची आहे ती का घ्यायची आहे. पूर्वीच्या मोटारीमध्ये काही कमतरता वा अपुरेपणा वाटत असल्याने तुम्हाला नवी व मोठी वा तुमच्या आता जाणवणार्‍या अपेक्षांसाठी तुम्ही मोटार घेणार आहात तेही ठरविणे अतिशय गरजेचे आहे. नवीन मोटार घेताना विशेष एक्स्चेंज ऑफरचा फायदा घेत वा प्रथमच मोटार घेत असाल व ती सणांच्या प्रारंभी घरात यावी म्हणून घेत असाल तरीही पूर्ण विचार करूनच ती मोटार निवडणे महत्त्वाचे आहे. वास्तविक काही लोकांना मोटार केवळ शोभेसाठी घेण्यात रस असतो किंवा ती कशी दिसते त्यानुसार भुलून जाण्यातही रममाण व्हावेसे वाटते, पण तसे होऊ नये. प्रत्येक ग्राहकाने आपला ग्राहक म्हणून असणारा हक्क व चोखंदळपणा या सणाच्या उत्साहात हरवू नये, हेच महत्त्वाचे आहे.
वापरलेल्या मोटारी घेताना अनेक बाबींचा विचार करावा. सेकंडहॅण्ड मोटारी वाईट वा खराब झाल्या किंवा जुन्या झाल्या म्हणून विक्रीला काढल्या जातात, असे नाही. काही कारणे असली तरी वापरलेली मोटार घेताना अनेक बाबी लक्षात घ्यायला हव्यात.
ती मोटार किती साली उत्पादन झालेली आहे.
किती किलोमीटर रनिंग झालेले आहे.
मोटारीची स्थिती कशी आहे.
मोटारीच्या आरसी बुक वा संलग्न शासकीय नोंदणी वा पोलीस ठाणे वा बँका यांच्याकडे मोटारीबाबत काही गुन्हा वा बोजा दाखल नाही ना.
मोटारीचा मालकाने सर्व देणी चुकती केलेली आहेत ना.
तुमच्या विविध अपेक्षांनुसार मोटार पसंत आहे का, त्यातील गुण व दोषांसह तुम्हाला माहिती कळली आहे का, त्याची चाचणी तुम्ही केली आहे का.
या व अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे कळल्याशिवाय सेकंडहॅण्ड मोटार घेणे हे तसे योग्य ठरणार नाही.

http://wegvan.in/wp-content/uploads/2015/04/salecar3.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/04/salecar3-150x150.jpgadminविशेष लेख
 गेल्या काही महिन्यांपासून मोटार उद्योगाला तसे काहीसे मंदीने, वाढत्या उत्पादनमूल्याने, करवाढीने आणि इंधनदरवाढीने ग्रासले आहे. तरीही मोटार उद्योगातील विविध कंपन्यांनी आपली नवी नवी मॉडेल्स भारतीय ग्राहकांपुढे ठेवली आहेत. अर्थात हे न संपणारे आहे. महागाई तशी नवीन बाब राहिलेली नाही. समजातील एका विशिष्ट वर्गाच्या दृष्टीने ही महागाई नित्याची समजली जाते...