दैनंदिन जीवनात सौंदर्य साधनेचा अविभाज्य घटक असलेला आरसा हा वाहन चालकाचा जणू तिसरा डोळाच ! वाहन सुरक्षेच्या द्रृष्टीने आरसा ( रिअर व्ह्यू मिरर ) हे अत्यंत साधे परंतु अत्यावश्यक असे उपकरण आहे. वाहन उद्योगातील आरशाच्या वापराचा इतिहास व कालपरत्वे त्यात होत गेलेल्या सुधारणा ह्याही तितक्याच रंजक आहेत. तर ह्या लेखात त्याबाबत थोडेसे जाणून घेऊया.

          वाहनात बसवण्यात आलेला आरसा हा चालकास मागून येणार्‍या वाहनांवर नजर ठेवण्यास मदत करतोmirrorwv3. यामुळे मागून येणार्‍या वाहनाला जागा देणे तसेच पुढच्या गाडीला मागे टाकताना (ओव्हरटेक करताना) आपल्या पाठीमागच्या गाडीत सुरक्षित अंतर आहे ना याची खातरजमा करण्यासारख्या गोष्टी सुलभरित्या करता येतात. त्याचबरोबर रिव्हर्स गीअर मधे गाडी मागे घेत असताना मागील परिस्थितीचा अंदाज घेणे आरशामुळे सोपे जाते. सर्वसाधारणपणे आरसा गाडीच्या समोरच्या काचेवर आतील बाजूने बसविलेला असतो. तसेच गाडीच्या बाहेरच्या बाजूने बसविण्यात आलेले दोन आरसे ज्यांना इंग्रजीत साईड मिरर म्हणतात त्यांचाही उपयोग याच कामासाठी होतो.
          इतिहासावर नजर टाकल्यास असे आढळून येते की विसाव्या शतकाच्या अगदी सुरवातीलाच वाहन उद्योगाने आरशाची दखल घेणे सुरु केले होते. अगदी सुरवातीला उत्पादक जेव्हा उत्पादन केलेल्या वाहनांवर आरसे बसवत नसत त्यावेळी हातात धरण्यासारख्या छोट्या आरशांचा वापर केला जात असे. हे आरसे चालकांना सोबत घेउन बसावे लागत असत. जेव्हा जेव्हा पाठीमागे बघायची गरज भासेल तेव्हा हा आरसा हातात घेउन पाठीमागे mirrorwv4बघायचे व परत खाली ठेवून द्यायचा अशा पद्धतीने हे आरसे वापरण्यात येत असत. त्यानंतर मात्र साधारणपणे १९१४ नंतर उत्पादन केलेल्या सर्व वाहनांवर कंपनीकडूनच आरसे बसवून येऊ लागले. ह्या आरशांची मूळ कल्पना घोडागाडी मधे वापरण्यात आलेल्या आरशांवरुन घेण्यात आली होती. नव्याने तयार होणार्‍या वाहनांवर आरसा बसवण्याची संकल्पना वाहन उद्योगात रुजवण्याचे श्रेय एल्मर बर्जर यांना जाते.
    mirrorwv5      आता आरशांच्या तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांचा आढावा घेउया. अगदी सुरवातीच्या काळात आरशात वापरण्यात येणारी काच सरळ असे. अशा प्रकारच्या आरशात दिसणारी प्रतिमा ही तिच्या मूळ वस्तूच्या अंतराशी साधर्म्य सांगणारी असली म्हणजेच दूरच्या वस्तूची प्रतिमा दूर तर जवळच्या वस्तूची प्रतिमा जवळ भासणे; तरीही त्यांची क्षमता कमी होती. म्हणजेच फार दूरच्या वस्तूंचे प्रतिबिंब टिपण्यात ते असमर्थ होते. जलदगती रस्त्यांचा विकास व वाहनांचा वाढता वेग यामुळे गाडीच्या मागील स्थितीचा दूरवर अंदाज घेता येणे ही काळाची गरज बनली होती. यातूनच बर्हिवक्र(Convex) काचांचा वापर आरशात होऊ लागला. त्यामुळे दूरवरच्या वाहनांचे देखील प्रतिबिंब टिपता येऊ लागले. या क्षमतेत बर्हिवक्र काच असणारे आरसे साध्या काचेपेक्षा खूप उजवे आहेत. परंतु बर्हिवक्र आरशांची एक कमतरता आहे ती म्हणजे ती म्हणजे त्यांच्यामधे दिसणारी प्रतिमा ही वस्तू जवळ असली तरीही दूरवर असल्यासारखी भासते. सध्या आरशांवर दिसणारे ‘Objects in this mirror are closer than they appear’ हे वाक्य तेच सूचित करण्यासाठी लिहीलेले असते. चालकांनी ह्या गोष्टीची खूणगाठ बांधूनच त्यानुसार वाहन चालवताना दक्षता घेणे अभिप्रेत आहे. याच काळात वाहनात आरसे बसविण्याच्या  तंत्रातही सुधारणा होत गेल्या.सध्याच्या काळात वाहनाच्या आतील भागात बसवण्यात येणारा आरसा अशा पद्धतीने बसवलेला असतो की अपघाताच्या वेळी म्हणजेच गाडीला समोरुन धडक बसली असता आरसा चालकापासून दूर म्हणजेच वरच्या बाजूला झुकतो जेणेकरून त्यामुळे होणारी संभाव्य इजा टाळता येते. त्याचप्रमाणे शहरांमधील वाहनांची विशेषत: दुचाकीस्वारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुढच्या बाजूला सुद्धा झुकू शकतील असे साईड मिरर विकसित करण्यात आले. यापूर्वीच्या काळातील आरसे ज्यांना अशी सोय नव्हती ते एखाद्या सायकलस्वाराची अथवा दुचाकीस्वाराची जोरात धडक लागली असता निकामी होत असत. परंतु आता झुकू शकणार्‍या आरशांमुळे हा धोका बर्‍याच अंशी कमी झाला आहे.
          यानंतरच्या काळातील सुधारणांमधे प्रामुख्याने अँटी ग्लेअर व ऑटो डिमींग या तंत्रांचा उल्लेख करावयास हवा. तंत्रज्ञान विकासामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रखर व लांबवर पोहोचू शकणार्‍या  वाहनांच्या मुख्य दिव्यांमुळे (हेडलॅम्प) रात्रीच्या वेळी आरशातून होणार्‍या परिवर्तनाचा त्रास चालकांना सहन करावा लागत असे. या त्रासापासून बचावाकरता सर्वप्रथम ‘
‘अँटी ग्लेअर ‘ आरशांचा शोध लावण्यात आला. त्यांनाच ‘डे- नाईट’ आरसे असेही संबोधण्यात येते. या आरशातील काचेचा आकार प्रिझमसारखा (काहीसा त्रिकोणी) असतो. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना आरशाच्या जवळ बसवलेली एक छोटी दांडी वापरून आरशाचा कोन असा बदलता येतो की त्यामुळे मागील गाडीच्या दिव्याचे परिवर्तन खूप प्रमाणात कमी करता येते व पर्यायाने चालकाच्या डोळ्यांवरील ताण बर्‍याच प्रमाणात हलका होतो. यापुढील विकासाच्या पायरीवर ‘ऑटो डिमींग’ आरसे येतात. या प्रकारच्या आरशांमधे फोटोसेन्सर बसवलेले असतात. हे सेन्सर आरशावर प्रकाश पडताक्षणीच त्याची तीव्रता मोजतात व इलेट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रकाशाची तीव्रता डोळ्यांना त्रास होणार नाही इतकी कमी करतात. वरील सर्व सुधारणांमुळे आरशांचे तंत्रज्ञान खूपच प्रगत झालेले असले तरीही आरशांमधे मुलभूत अशी एक कमतरता आढळून येते, ती म्हणजे आरसे हे गाडीच्या बरोबर पाठीमागचा खालचा भाग दाखवू शकत नाहीत. ह्या कमतरतेवर मात करण्यासाठी सध्या वाहनांमधे आरशांऐवजी व्हिडीओ कॅमेरे बसविण्यास सुरवात झालेली आहे. कॅमेरा वापरल्यामुळे गाडीच्या मागील भागाचा पूर्णपणे अंदाज येतो. व एखादी लहान वस्तू जरी तिथे असेल तरी योग्य ती काळजी घेता येते. सुरक्षेच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान नक्कीच उजवे आहे परंतु वाढीव किंमतीसारख्या काही त्रुटीदेखील यात आहेत. तसेच कॅमेर्‍याने चित्रित केलेले दृष्य वाहन चालकास दाखवण्यासाठी गाडीत संगणकासारखे डिस्प्ले लावणे गरजेचे बनते.एकंदरच या तंत्रज्ञानासाठी लागणार्‍या  बाकी सुविधा जास्त खर्चिक वाटतात. तरीही भविष्यातील गाड्यांवर याच तंत्राचा जास्त वापर होणार यात शंकाच नाही!
          तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही त्याची उपयुक्तता ही पूर्णत: वापर करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून असते.त्यामुळे गाडी चालवताना आरशांचा अजिबात वापर न करणार्‍या चालकांना त्यांचा योग्य वापर करून सुरक्षित वाहतुकीस हातभार लावण्याचे आवाहन करावेसे वाटते!
http://wegvan.in/wp-content/uploads/2015/07/mirrorwv6.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2015/07/mirrorwv6-150x150.jpgadminसाधन-सामग्रीanti glare,elmer burger,mirror,reare view mirror,side mirror
  दैनंदिन जीवनात सौंदर्य साधनेचा अविभाज्य घटक असलेला आरसा हा वाहन चालकाचा जणू तिसरा डोळाच ! वाहन सुरक्षेच्या द्रृष्टीने आरसा ( रिअर व्ह्यू मिरर ) हे अत्यंत साधे परंतु अत्यावश्यक असे उपकरण आहे. वाहन उद्योगातील आरशाच्या वापराचा इतिहास व कालपरत्वे त्यात होत गेलेल्या सुधारणा ह्याही तितक्याच रंजक आहेत. तर ह्या...