मोटारींची किंमत हा एक मोठा औत्सुक्याचा विषय आहे. मोटार विकत घेणारा असो किंवा नसो. मोटारीची किंमत किती याची चर्चा करणारा वर्ग मोठा आहे. कारण शेवटी मोटार घ्यायची झाली की, मोटारीची किंमत किती ते कळल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. यासाठीच मोटारीची नेमकी किंमत किती  द्यावी  लागते, व ती कशा प्रकारे विभागलेली असते ते समजून घेणे मोटार ग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचे अाहे.

भारतात मोटारीची एक्स शोरूम किंमत ही सरसकट दिसून येत नाही. ऑन रोड किंमतही तशी वेगवेगळी असते. स्थानपरत्त्वे या किंमती बदलत असतात. मोटारींच्या कंपनींकडून मोटारींच्या केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये दाखवलेली किंमत ही बहुतेक करून एक्स शोरूम दिल्ली अशी दाखवली जाते. मग संभाव्य ग्राहक मुंबईतला वा बाहेरचा असला तरी तो गोंधळून जातो, जेव्हा तो दिल्लीतला नसतो व तो ज्या ठिकाणाहून मोटार विकत घ्यायची आहे, त्या शहरातील मोटारीच्या शोरूममध्ये जातो. कारण होते काय, दिल्लीची किंमत एक्स शोरूम कमी असते व तो मुंबई, ठाणे, या अन्य शहरातील वा अन्य राज्यामधील असतो, तेथे असलेली त्या मोटारीची एक्स शोरूम किंमत ही दिल्लीपेक्षा खूप अधिक वाटते. अर्थात मध्यमवर्तीय वा उच्च मध्यमवर्गीय ग्राहकाला हे जास्त जाणवते. कारण त्याचे बजेट ठरावीक असते.
यासाठीच मोटारीची किंमत म्हणजे नेमके काय गौडबंगाल आहे, हे समजून घेतले तर बराच गोंधळ कमी होईल. किंबहुना सध्याच्या भाजप-रालोआ सरकारने जीएसटी लागू केले तर कदाचित दिल्ली व अन्य ठिकाणी असलेली ही एक्स शोरूम किंमत वा अॉन रोड किंमतही एकच होऊ शकेल. अर्थात या जर तरच्या गोष्टी आहेत. जीएसटी लागू होईल तेव्हा खरे.
तूर्तास गाडीची किंमत म्हणजे नेमकी कशी पाहिली जाते ते पाहू. एक्स शोरूम किंमत म्हणजे नेमकी कशी लागू असते?
मोटार खरेदी ज्या डिलरकडून करतो, ज्या शोरूममधून विकत घेतो, त्याने मोटार उत्पादकाकडून मोटार विकत घेतलेली असते. त्या मोटारीसाठी उत्पादकाला मोजलेली किंमत ही या एक्स शोरूम किंमतीत अंतर्भूत असते. याशिवाय ही खरेदी करताना डिलर राज्य सरकारला काही कर भरतो, एक्साइज ड्युटी भरतो. ही सर्व मिळून एक्स शोरूम किंमत तयार होते. मोटारीची पुरवठा किंमत असेही या किंमतीला म्हटले जाते. भारतात काही राज्यांमध्ये एक्स शोरूम किंमतीत अॉक्ट्रायचाही समावेश असतो. हा मोटारीवरील कर स्थानिक प्रशासनाकडून वसूल केला जात असतो. अन्य प्रांतातून एखादी वस्तू त्या प्रांतात आणली जात असताना हा करघेतला जातो. अशा ठिकाणी एक्स शोरूममध्ये हा करही समाविष्ट केला जातो, अर्थात हे सर्व राज्यांमध्ये लागू असते असे नाही.
भारतात मोटारींच्या जाहिरातींमध्ये एक्स शोरूम किंमत देताना ती विशेष करून दिल्लीची दिली जाते जी किंमत अन्य राज्यांच्या तुलनेत कमी अाहे. याचे कारण तेथे आकारले जाणारे कर, न आकारले जाणारे कर व त्यांची कमी टक्केवारी हे आहे.
ही एक्स शोरूम किंमत देऊन मोटार प्रत्यक्ष रस्त्यावर आणता येत नाही, त्यासाठी अॉन रोड किंमत भरावी लागते. एक्स शोरूम किंमत मोटार रस्त्यावर आणण्यासाठी पुरेशी नाही. त्यासाठी आरटीओ, नोंदणी, विमा, रोड टॅक्स, या प्रमुख बाबींचा समावेश अाहे. याशिवाय मोटारीचा उत्पादकाकडून डिलरने मोटार विकत घेतल्यानंतरचा वाहतुकीचा खर्च, ती मोटार प्रत्यक्ष ग्राहकाला हातात मिळेपर्यंत असलेला गोदाम व देखभालीचा खर्च अशा बाबीही आजकाल डिलकरकडून अॉन रोड किंमतीमध्ये वसूल लकेल्या जातात. अॉन रोड किंमतीत मोटारीची एक्स शोरूम किंमतही अंतर्भूत असते. थोडक्यात मोटारीची अॉन रोड किंमत भरल्यानंतर डिलर ग्राहकाच्या हाती मोटारीच्या चाव्या देतो.
http://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/new-cars1.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2014/09/new-cars1-150x150.jpgadminविशेष लेखexshowroom price onroad car motor deler
मोटारींची किंमत हा एक मोठा औत्सुक्याचा विषय आहे. मोटार विकत घेणारा असो किंवा नसो. मोटारीची किंमत किती याची चर्चा करणारा वर्ग मोठा आहे. कारण शेवटी मोटार घ्यायची झाली की, मोटारीची किंमत किती ते कळल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. यासाठीच मोटारीची नेमकी किंमत किती  द्यावी  लागते, व ती कशा प्रकारे...