मोटारीचे बाह्यांग छान दिसण्यासाठी विविध उपाय केले जातात. पण हे त्यामागे उद्दिष्ट खरे कोणते असावे, हे ध्यानात घेणेही गरजेचे आहे. मोटार बाळगणे ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी आता राहिलेली नाही. मध्यमवर्गीयांकडेही ही मोटार नावाची एक मालमत्ता असते. मोटार त्यांना काही वर्षांमध्ये बदलून नवीन घेण्याची हौस मनात असली तरी प्रत्येकाला ते शक्य नसते. पण ही मोटार नीट राहिली तर त्या मोटारीचा लाभ अधिक काळ घेता येऊ शकतो, हे लक्षात ठेवायला हवे. मोटारीच्या बाह््यांगाबाबत म्हणजे तिचा पत्रा, रंग आणि अन्य भाग यांची देखरेख नीट ठेवली तर मोटारीचा टिकाऊपणा वाढेल व तिची किंमतही शाबूत राहील.

सध्याच्या मोटारी या साधारण एकसंघ अशा पत्र्याच्या बनविल्या जातात. स्वतंत्र चासीवरील मोटारीपेक्षा त्या स्वस्त अशा या मोनोकॉक पद्धतीने बनविलेल्या असल्याने उत्पादनाच्या किंमतीही कमी होऊन त्यांना अन्य काही सुरक्षितता मिळते. चासीच्या आधारे तयार केलेली मोटार व मोनोकॉक पद्धतीने तयार केलेली मोटार यांचा विचार करता मोनोकॉक पद्धतीमुळे मोटारीच्या बाह्यांगाला नीट ठेवणे ही अतिशय गरजेची बाब म्हणायला लागेल. आरेखनामध्ये पत्र्यांना एकमेकांना जोडून मोटारीचा सांगाडा तयार केला जातो. त्यामुळे या बाहेरच्या अंगाचा पत्रा, त्यावरील रंग नीट ठेवणे, तो गंजू नये वा त्याचे काही नुकसानही होऊ नये म्हणून देखभाल करणे ही बाब अतिशय गरजेची ठरते. चासी पद्धतीमधील मोटारी तयार करणे हे तसे जुन्या प्रकारातील काम. ते मजबूत असले तरी त्यांची किंमतही महाग होत असते. साधारणपणे छोट्या प्रवासी वाहनांना आता मोनोकॉक पद्धतीमुळे तयार करणे सोपे व गतीमान झाले आहे. मोठ्या गाड्यांच्याबाबत मात्र चासी स्वतंत्र असणे सुरक्षितता आणि मजबूतपणा यासाठी उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे प्रवासी वाहनांमध्ये मोडणाऱ्या या मोटारी एकसंघ असे पत्रे जो मोल्ड केलेल्या साच्यांद्वारे तयार करून वेल्ड केले जातात, अशा मोटारींची बाह्यांगाची देखभाल ही त्या मोटारीच्या आरोग्यासाठी वरदानच असते हे लक्षात घेतले पाहिजे. मोटारीचे पत्रे गंजू नयेत यासाठी त्यावर ती मोटार तयार करताना रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यानंतर त्यावर रंग देताना होणारी प्रक्रिया व रंगांमध्ये असलेले गंजप्रतिबंधक, उष्णतारोधक असे घटकही मोटारीचे आयुष्य वाढविणारे असतात. यासाठीच तो पत्रा आणि रंग यांची देखभाल नीट असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच रंगालाही जपायला हवे हे ध्यानात घ्यायला हवे. मोटारीचा रंग चांगला टिकविलात तर त्याखालील पत्र्याचेही आयुष्य वाढले जाते, पर्यायाने मोटारीचे केवळ देखणेपण नव्हे तर टिकाऊपणाही गरजेचा असतो हे समजू शकेल. भारतासारख्या देशात विविध भागांमध्ये भिन्न तापमान असते. भिन्न वातावरण असते. यामुळेच त्याचे परिणाम मोटारीच्या बाह्यभागावरही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे होत असतात. यासाठी त्यांची देखभाल करताना त्या त्या वातावरणानुसार देखभाल करायला हवी. सागरी भागामध्ये हवामान हे दमट असते व खारी हवा असते. तेथील पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असते. पावसाळा अधिक असतो तर उन्हाळ्यात अतिकडक उन्हाळा नसतो. साधारणपणे मुंबई, कोकण, ठाणे जिल्ह्यातील सागरी पट्टा या ठिकाणी अशी स्थिती असते. पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, नाशिक या भागात मात्र वातावरण वेगळे असते. तेथील हवा कोरडी असते. थंडी अधिक असते. धुके, दव यामुळे थंडीमध्ये होणारे परिणाम मोटारीवर होत असतात. पण पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असते. काही ठिकाणी काहीसे जड पाणीही असते. तर पावसाळ्यात या ठिकाणी कमी, अधिक वा अतिवृष्टीही होत असते. उन्हाळा मातच्र चांगलाच तापदायक असतो. या स्थितीचा मोटारीच्या बाह्यांगावर परिणाम होत असतो. या दोन्ही प्रकारच्या वातावरणाचा विचार करता मोटारीच्या बाह्यभागावर होणारे परिणाम लक्षात घेऊन देखभाल करणे गरजेचे आहे.
पाण्याचा वापर
मोटार धुणे ही बाब अतिशय गरजेची असते. पण ती करताना आपण कोणत्या भागात राहातो, तेही ध्यानात घ्यावे. सागरी पट्टयात राहाणाºयांनी सतत पाण्याचा वापर करून मोटार धुणे शक्यतो टाळावे. मोटार धुतल्यानंतर ती पूर्णपणे वाळणे गरजेचे आहे. पाणी तसेच अडचणीच्या ठिकाणी राहिल्यास, तो भाग दमट व खाºया हवेमुळे गंजण्यास मदत होत असते. त्यामुळे मोटार धुतल्यानंतर हवेचा फवाराही अडचणीच्या जागी मारून तेथे अडकलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. विशेष करून स्कूर, नटबोल्ट, बिजागिरे अशा ठिकाणी हे पाणी साचून कालांतराने पत्रा खराब होऊ शकतो. अर्थात हे पाण्याचा वापर सातत्याने बेफिकीरीने केल्यास होऊ शकते. अतिउन्हाळ्यात मोटारीच्या रंगावर पाण्याचा थेंब राहातो. अतिकडक उन्हामध्ये मोटार तशीच ठेवली व पाण्याचा थेंबावर सूर्यकिरण पडतात तेव्हा त्या थेंबाला काहीवेळा भिंगासारखी रचना प्राप्त झाल्याने रंगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गाडी धुतल्यानंतर पाणी आपसूक वाळून जाईल, उन्हामुळे वाळेल अशा विचारात राहू नये. त्या त्या वातावरणाचा परिणाम लक्षात घेऊन मोटारी धुतल्यानंतर पाणी शक्यतो कसे निचरा होऊन लगेच निघेल ते पाहावे. क्षारयुक्त पाण्याचा वापर मोटारी धुण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी अनेक भागात केला जातो. टँकरचे, विहीरीचे पाणी येथे वापरले जाते. हे पाणी जवळच्या विंधनविहीरीतून आणले गेलेले असते. अशा ठिकाणी पाण्यामध्ये असणारे क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने तेथे सतत मोटारी अशा पाण्यात धुतल्यास त्याचे दुष्परिणाम पत्र्यावर होत असतात. तेथे मोटारी धुतल्यास मोटारीवरील पाण्याचा निचरा लगेच कसा होऊल ते पाहाणे गरजेचे आहे. तेल, चिखल काढण्यासाठी अडचणीच्या भागात मोटारीवर पाण्याचा फवारा मारला जातो. तेथे पाणी साठून राहीले तर विशेष करून दमट व खाºया हवेच्या वातावरणात ते पाणी मोटारीच्या पत्र्याचे आयुष्य कमी करू शकते. अशावेळी मोटारीचे धुणे हे गरजेचे असले तरी पाण्याचा किमान वापर करून बाह््यांग लगेच कोरडे करून घेणे गरजेचे असते.
साबणाचा वापर
साबणाचा वापर करताना सौम्य अल्कली असलेला साबण शक्यतो वापरावा. अल्कलीचे प्रमाण अधिक असणारा साबणद्राव वापरू नये. ऑटोमोबाइलसाठी असलेला साबणही बाजारात मिळतो किंवा शांपूचा वापर करावा. कपड्याचा वा भांड्याच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा साबण वा साबणद्राव वापरू नये.
रबिंग, पॉलिश यांची प्रक्रिया
मोटार धुतल्यानंतर बाह््यांग चांगले दिसण्यासाठी बाजारात मिळणाºया रबिंग सोल्युशनचा वा वॉक्स पॉलिशिंगचा वापर केला जातो. त्यापैकी रबिंग सोल्युशन हे शक्यतो व्यावसायिक कारागिराकडून ज्या प्रकारे वापरले जाते त्यामुळे रंगावरील ओरखडे बºयाच प्रमाणात काढले जातात. पण त्याचाही अतिरेकी वार करू नये. त्यापेक्षा द्रव स्वरूपातील वॅक्स पॉलिश तुम्ही स्वत:ही केले तरी चालू शकेल. त्यासाठी अगदी यंत्राची गरज नाही, मऊ कपड्याद्वारे हाताने वॅक्स पॉलिश करणे अधिक चांगले. वॅक्स पॉलिशमुळे रंगाती स्थिती नक्कीच चांगली राहण्यास मदत होते. चिखल घातकच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खराब रस्त्यांबरोबरच डोकेदुखी असते ती मोटारीच्या रंगावर उडणारा चिखल किंवा मोटारीच्या चाकांच्यामुळे त्या नजीकच्या खालील भागात उडणारा चिखल, त्यातील तेलासारखे चिकट घटक यांची. हा तेलासारखा चिकट असणारा चिखल मोटारीच्या पत्र्याला वा प्लॅस्टिकला खराब करू शकतो. मोटारीचे आयुर्मान वाढविण्यासाठी अशा गोष्टींची वेळीच काळजी घ्यायला हवी. चिखल घट्ट झाला तर तो काढताना पाण्याचा, त्यात साबणद्राव टाकून मोटार धुण्याकडे वेळीच भर द्याायला हवा. पाण्यामध्ये डिझेल वा रॉकेल काही प्रमाणात टाकून चिखलयुक्त भाग धुवून काढण्यास काहीसे सोपे जाते.
वंगणाची प्रक्रिया
मोटारीच्या पत्र्याला संलग्न असणाऱ्या काही भागांना नटबोल्टने जोडलेले असते. दारांची बिजागिरे, कुलूप हॅण्डल्स आदी बाबीं चांगल्या स्थितीत राहाव्यात व विनासायास वापरता याव्यात म्हणून त्या ठिकाणी तेलाचा वापर थोड्या थोड्या प्रमाणात विशिष्ट कालावधीत करणे गरजेचे असते. वंगणाचे हे काम वेळच्यावेळीस झाल्यास आवाज कमी होणे, घट्टपणा न राहाणे या गोष्टींबरोबरच नटबोल्ट गंजून तो भाग खराब होण्याचेही टाळता येते. उन्हाळा व कडक उन्हापासून, पावसाळ्यापासून संरक्षण कडक उन्हापासून व पावसाळ्यातील पाण्यापासून काही ठिकाणी मोटारीला कव्हर टाकणे अतिशय आवश्यक असते. सातत्याने मोटार वापरणार नसल्यास व मोटार उघड्यावर उभी करणार असल्यास मोटारीचे कव्हर घेऊन त्याचे आच्छादन करणे अतिशय गरजेचे आहे. धुळीपासून, पाण्यापासून व अति कडक उन्हापासून मोटारीच्या रंगाचा बचाव त्याने करता येतो. अतिकडक उन्हामध्ये रंग तडकण्याचीही शक्यता असते. तसेच काच ज्या रबरांवर बसविलेली असते ते रबरही खराब होऊ शकतात. यासाठी अतिकडक उन असलेल्या भागांमध्ये विशेष करून कोरड्या हवेच्या ठिकाणी मोटारीला कापडी, नायलॉनचे आच्छादन टाकणे उपयुक्त ठरते.
काचांची स्वच्छता
काचांना स्वच्छ ठेवणे हे वाहन चालविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. मागचे पुढचे त्या काचांमधून नीट व स्वच्छ दिसणे गरजेचे आहे. मोटारीच्या काचांवर झाडाखाली असताना पडणारी धूळ, पाने, त्यांचा चिक तसेच पक्ष्यांच्या विष्ठा यामुळे काचेवर एक प्रकारचा स्तर तयार होतो. तो साफ करून काच साबणमिश्रित पाण्याने स्वच्छ करायला हवी. वायपरच्या पाण्याच्या टाकीमध्ये शांपूसारखा सौम्य साबणद्राव टाका किंवा नुसते पाणी टाका त्यातून पावसाळाच नव्हे तर अन्य ऋतूमध्येही मोटार चालविताना वायपरचा वापर करून काच स्वच्छ करायला हवी. धूळ वेळीच झटकून टाकून मगच वायपरचा वापर करावा. अन्यथा वायपर ब्लेड खराब होणे, काचेवर नीट वाईप न होणे असे त्रास होतात.
कापडाचा वापर
मोटार स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे कापडही अगदीच राब घेऊ नये. टॉवेल्स, पातळ कापड यांचा वापर करावा. बाजारात मिळणाऱ्या मोटारी वा स्वच्छतेसाठीची विशिष्ट सिंथेटिक कापडही वापरायला हरकत नाही. गोणपाटासारखे जाड कापड मात्र गाडी धुतल्यानंतर पुसायला वापरू नये. काचेवर कापडाने पुसताना नीट पुसावे व ओलेपणाही नीट नाहीसा करावा. धूळ झाडताना अति मोठे व जड कापड वापरू नये. त्यामुळे कधी वायपरला धक्का लागून तो खराब होण्याची शक्यता असते तर कधी आरशाला नुकसान होण्याचीही शक्यता असते. पाण्याच्या स्प्रेने पाणी उडवून स्पंजच्या सहाय्याने दररोज मोटार साफ करणे काहीसे सोपे आहे. त्यासाठी अति मेहनत करावी लागत नाही.
—-
adminदेखभालcar,car outer maintance,chasi,maintance,monoquaq
मोटारीचे बाह्यांग छान दिसण्यासाठी विविध उपाय केले जातात. पण हे त्यामागे उद्दिष्ट खरे कोणते असावे, हे ध्यानात घेणेही गरजेचे आहे. मोटार बाळगणे ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी आता राहिलेली नाही. मध्यमवर्गीयांकडेही ही मोटार नावाची एक मालमत्ता असते. मोटार त्यांना काही वर्षांमध्ये बदलून नवीन घेण्याची हौस मनात असली तरी प्रत्येकाला ते शक्य...