काळ बदलतो तसे माणसांनाही बदलावे लागते. म्हणजे गाडी घ्यायची इच्छा फलद्रूप होते तेव्हा घरामध्ये व त्या गाडी घेणाऱ्याच्या मनामध्येही आनंदाचे फवारे उडत असतात. … हे असे एकेकाळी चित्र होते. आजही काही प्रमाणात आहे. पण शहरांमधील अनेक अडीअडचणींमध्ये गाडी घ्यायचा आनंद खरंच होतो का, असा प्रश्न पडतो. काहीजण टॅक्सी, रिक्षाने त्रास होतो तर ओला उबेर यासारख्या मोबाईल अॅपच्या टचवर उपलब्ध होणाऱ्या टॅक्सींचा वापर करण्याचा सल्ला देतात. अनेकांना तो पटतोहीतरीही मोटार घेणे ही बाब एका इच्छापूर्तीसाठी पुरेशी ठरते अनेकांना.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईपुण्यासारख्या शहरांमधील वाहतुकीची स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. असे असतानाही मोटारींची संख्या वाढत आहे. व्यावसायिक वाहनांची संख्याही कमी झालेली नाही. तरीही अनेकांची मोटार घेण्याची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी काही ना काही मार्ग काढलेही जातात. जीवनावश्यक असे घर घेतले, त्यातील सुखसुविधांचा विचार केला, तो पूर्ण झाला, त्यानंतर चारचाकी गाडीच्या चाव्या आपल्या हातात असाव्यात अशी इच्छा साहजिक होते. पण मुळात त्या स्व इच्छेलाही अनेक बाजू आहेत, अनेक पैलू आहेत, ही बाब लक्षात घ्यायला हवी. आज असेच मोटार घेणारे इच्छुकही बरेच आहेत व मोटार घेण्यापूर्वी अनेक बाजू पाहाणारेही बरेच आहेत. मोटार ही एक आपली प्रेस्टिजची बाजू असते, हा समज अनेकांच्या मनातून बाहेर गेला आहे. त्याचीही कारणे अनेक आहेत. त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, वातावरण यांच्या बदलांचे परिणामही आहेत.

अगदी छोटे छोटे मुद्दे त्याबाबत पाहूया.

रिक्षाटॅक्सी

  यांची उपलब्धता आज आहे पण अनेक शहरांमध्ये रिक्षा व टॅक्सी चालकांची मुजोरी हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे, त्यामुळे लोकांना किमान छोटी कार घेणे आवश्यक वाटते. तसेच ओलाउबेर यासारख्या टॅक्सीसेवांमुळे अशा सार्वजनिक वाहनाचीही उपलब्धता अनेकांना भावलेली आहे, त्यामुळे काहींना स्वतः मोटार घेणे गरजेचे वाटत नाही.

बस, रेल्वे 

बस व रेल्वे यांचे महत्त्व अनन्.साधारण आहे. केवळ मध्यमवर्गीय व गरीब लोकांचे वाहन म्हणून या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांकडे अजूनही पाहिले जाते. स्वस्त असले तरी वाढत्या गर्दीमुळे अनेकांना ते सोयीचे वाटते व वाटतही नाही. रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे बसमधून जायला होणारा उशीर व अशा वाहतूक कोंडींत बसमध्ये असल्याने ड्रायव्हिंगचा वाचलेला त्रास किंवा पेट्रोल, डिझेल यावर अपव्यय वाटतो, असे मानणारा वर्ग असे दोन्ही प्रकार असल्याने मोटार घेताना या बसबाबतही एक पर्याय म्हणून पाहिले जाते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात रेल्वे, मोनो, मेट्रो हे पर्याय लोकलच्या तुलनेत सुसह्य वाटू लागले आहेत. इतकेच नव्हे तर लोकलही वेळेमध्ये जाण्याचे साधन म्हणून अजूनही पाहिली जाते. अर्थात अतिउच्च आर्थिक गटातील लोक फारच कमी प्रमाणात रेल्वेने प्रवास करतात. वर दिलेल्या सार्वजनिक वाहनांच्या प्रकारामुळे अजूनही स्वतःची मोटार हवी आहे व नको आहे, असे म्हणणारे अनेकजण आहेत.

पार्किंग समस्या 

  पार्किंग सुविधेच्या अभावी चारचाकी गाडी नकोरे बाबा, असे म्हणणारे अनेक शहरवासी दिसतात. विशेष करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत शहराच्या व्यावसायिक भागात गेल्यानंतर तेथे पार्किंगची समस्या भेडसावल्याने त्रस्त होणारा वर्ग मोठा आहे. किंबहुना या समस्येमुळे अनेकजण आजही स्वतःची कार घेण्याचा विचार करताना गांभीर्याने त्याबाबत पाहातात.

मॅन्युअल की ऑटोगीयर 

गेल्या काही काळामध्ये मोटारीच्या तंत्रामध्ये खूप फरक पडला आहे. अनेकांना आज मॅन्युअल गीयरची कार वापरण्याची सवय असली तरी वाढत्या वाहतूक कोंडीमध्ये व विशेष करून शहरी रस्त्यावर गाडी चालवताना मॅन्युअल गीयरपेक्षा ऑटोगीयर घेण्याकडे आज कल वाढत चालला आहे. या बाबत विचार करतानाही अनेक घटकांकडे वक्ष द्यायला हवे. केवळ वाहतुकीच्या कोंडीमध्ये वाहन चालवण्यास सोपे जाते इतकाच विचार करूनही उपयोगाचा नाही. त्यासाठी मॅन्युअल गीयरच्या तंत्राच्या फायद्याचा व तोट्याचाही पूर्ण विचार करावा. अन्यथा ऑटो गीयरची मोटार घेतल्यानंतर होणाऱ्या सुलभतेबरोबर काही वाहन चालवण्याच्या पद्धतीतही होणारे बदल व खर्च लक्षात घेणे गरजेचे आहे. अजून तरी भारतीय मानसिकतेते ऑटो गीयरची सुलभताच केवळ दिसून येत आहे. त्यामागून येणारे तोटे मात्र लक्षात घेणेही तितकेच गरजेचे आहे. नियंत्रण हे सर्वात प्रमुख असणारे वाहनचालकाचे अस्त्र असल्याने वाहनावर विविध पद्धतीने नियंत्रण ठेवणे मॅन्युअल इतके ऑटोगीयरच्या मोटारीत नसते, ही बाब समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात प्रत्येक वाहन चालकाचे कौशल्य हा ही कमी अधिक भाग असू शकतो.

देखभाल 

नवी मोटार म्हटली तरी कालांतराने नियमित काल व वापरण्याने तिची देखभाल ही योग्य असली पाहिजे. दीर्घकाळ मोटार वापरावयाची तर ती अधिकाधित चांगल्या अद्ययावत स्थितीत हवी हे गरजेचे असते. यासाठी जवळ गॅरेज असणे, सर्व्हिस सेंटर्स चांगली व विश्वासू असणे जसे आवश्यक आहे तसेच मोटारीचे पार्ट्स बदलावे लागतात, तेव्हा ते मिळतील व चांगले मिळतील की नाही, ह्याचीही खात्री करणे गरजेचे आहे. देखभालीमध्ये महत्त्वाचा भाग आहे विम्याचा. विमा काढतानाही सुरुवातीपासून त्याबाबत व त्याच्या विविध प्रकारांबाबत नीट माहिती करून घेणे आवश्यक आहे. झीरो डेप्रिसिएशनचा प्रकार म्हमजे नेमका काय, त्याचे फायदे तोटे कसे आहेत. अन्य प्रकारच्या विम्यामध्ये काय फायदे व तोटे आहेत ते ही समजून घेणे गरजेचे असते. विमा पहिल्या वर्षानंतर किती काळ पर्यंत झीरो डेप्रिसिएशनचा काढता येतो, त्यात कोणते कोणते पार्ट्स विम्याच्या दाव्यामध्ये अंतर्भूत असतात. त्यात अटी कोणत्याअसू शकतात, त्याच्या मर्यादा काय असतात, हे सारे समजून घेणे हा मोटारीच्या देखभालीतील एक महत्त्वाचा भाग आहे. तो कार घेण्याच्या विचाराबरोबरच समजून घेणेही गरजेचे आहे.

 

http://wegvan.in/wp-content/uploads/2018/05/micra-nissan-1024x528.jpghttp://wegvan.in/wp-content/uploads/2018/05/micra-nissan-150x150.jpgadminदुसरी बाजू...साधन-सामग्रीauto gear,maintance,parking,purchase,tag - car,taxi
काळ बदलतो तसे माणसांनाही बदलावे लागते. म्हणजे गाडी घ्यायची इच्छा फलद्रूप होते तेव्हा घरामध्ये व त्या गाडी घेणाऱ्याच्या मनामध्येही आनंदाचे फवारे उडत असतात. ... हे असे एकेकाळी चित्र होते. आजही काही प्रमाणात आहे. पण शहरांमधील अनेक अडीअडचणींमध्ये गाडी घ्यायचा आनंद खरंच होतो का, असा प्रश्न पडतो. काहीजण टॅक्सी, रिक्षाने...